खानापूर /प्रतिनिधी : अलीकडच्या काळात चोरी आणि फसवीगिरी हा चोरट्यांना सोपा आर्थिक कमाईचा भाग बनला आहे. शहरासह खेड्यापाड्यात कुलूप बंद असलेली घरे, ऑनलाइन फसवणूक किंवा पॉकेट मारी चोरी तसेच अनोळखी व्यक्तीकडून घरात घुसून धाक दाखवून लुटण्याचे प्रकार अलीकडच्या काळात वाढले आहेत. अशा प्रकारावर आळा घालण्यासाठी स्वतःची सुरक्षा स्वतःच करणे काळाची गरज बनली आहे. पोलीस प्रशासनही चोरट्यांच्या बंदोबस्तासाठी कार्यतत्पर आहे, पण चोऱ्या व ऑनलाईन फसवणूक मध्ये नकळत सर्वसामान्य व्यक्ती फसला जात आहे. यासाठी प्रत्येकाने स्वतःची जबाबदारी स्वतःच सांभाळत आपल्या मौल्यवान ऐवजांची जोपासना करावी. यासाठी प्रत्येक नागरिकांनी काय केले पाहिजे, यासंदर्भात खानापूर पोलिसांनी एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. या पत्रकातील मुद्द्यांचा सारासार विचार व अंमलबजावणी केल्यास अशा चोरी प्रकरणावर आळा बसेल असा आशावाद खानापूर पोलीस निरीक्षकानी या पत्रकाद्वारे केला आहे.
खालील मुद्दे न्याहाळा आणि अंमलबजावणी करा
१) तुमच्या घराला दरवाजे व खिडक्या मजबूत लावा इंटर्नल लॉक बसवुन आडव्या लोखंडी पट्टया बसवा. आणि घराच्या पाठीमागच्या दरवाज्याला लोखंडी ग्रील डोर करुन इंटर्नल लॉक लावावे.
२) परगावी जातेवेळी घरचा दरवाजा चांगल्या पध्दतीने लावला आहे कि नाही याची खात्री करुन घ्यावी व घरच्या ओळखीच्या लोकांना त्या बद्दल माहीती द्यावी.
३) घरचा दरवाजा लावुन दुसऱ्या गावाला जातेवेळी/ कामगार पती / पत्नी कामाला जातेवेळी किंमती वस्तु पैसे, सोने, चांदी सुरक्षित जागेला ठेवल्याची खात्री करा (बँक लॉकरमध्ये ठेवल्यास चांगले) विश्वासूकांच्या घरामध्ये सोपवा.
४) शक्य होईल तितके जास्त किंमतीच्या वस्तु सोने चांदी घरामध्ये ठेवू नका. बँक, ए, टी, एम/ लाकर सुविधा घ्या.
५) दिवसा/रात्रीच्या वेळी किंमती वस्तु इतरांना दिसण्यासारखे ठेवू नका. व खिडकीच्या बाजूला पर्स मोबाईल सोन्या चांदीच्या वस्तू, पँट, शर्ट ठेवू नका.
६) तुमच्या घरात/ दुकानात कामासाठी ठेवलेल्या नोकराचे नाव व पुर्ण पत्ता मोबाईल नंबर लिहून ठेवा तसेच शक्य असल्यास त्याचा फोटो काढून ठेवा.
७) सेल्समन घरी आल्यास कुठल्याही कारणास्तव त्याला आत येण्यास संधी देऊ नये बाहेर थांबूनच बोलावे. (शक्य असल्यास आजू बाजूच्या लोकांना बोलवावे.)
८) कोणीतरी संशयित व्यक्ती घर भाड्याने विचारण्यास आल्यास त्यांच्या बद्दल पूर्वीची माहिती मतदार ओळख पत्र, पॅन कार्ड, मोबाईल नंबर लिहून ठेवा तसेच शक्य असल्यास त्यांचा फोटो काढून ठेवा. ९) रात्रीच्या वेळी घर / दुकान आजूबाजूच्या आवारात लाईटिंग ची व्यवस्था व पहारेकरी ची नेमणूक करावी.
१०) घराला कुलूप लावून गावाला जातेवेळी पेपर वाटप करणाऱ्यांना पेपर न देण्यास सूचना द्यावी, चोरी करणारे खूप पेपर बघून घरामध्ये कोणी मालक नाही म्हणून समजून घेऊन चोरी करण्याची शक्यता बळावते.
११) एकत्रित घरे असणाऱ्यांची (अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या सगळ्यांनी मिळून एखादा पहारेकरी नेमावा / सी.सी कॅमेऱ्याची व्यवस्था करावी.
बँक व ऑनलाइन व्यवहाराला सबंधित घ्यावयाचे सावधानीचे उपाय
१) मोबाईल मध्ये आज तुम्हाला गिफ्ट आलेलं आहे म्हणुन एखादा संदेश आल्यास त्यावर विश्वास ठेवू नका. आम्ही बँकेतून फोन करुन तुमचे बँकचे ए.टी.एम कार्ड बंद झाले असून तुम्हाला दुसरे ए.टी.एम. कार्ड नंबर, गुप्त नंबर द्या असे विचारल्सास बँक खात्यावरील असलेले पैसे ऑनलाइन द्वारे गायब करतात. अश्या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवू नका.
२) ए.टी.एम. कार्ड वर पिन नंबर लिहू नका तुम्ही ए.टी.एम. मधून पैसे काढतेवेळी दुसऱ्याकडे ए.टी.एम. कार्ड देऊन पिन नंबर सांगुन पैसे काढण्यास कोणालाही सांगू नका. तसेच पैसे काढल्यावर थोडा वेळ तिथेच थांबून दुसरा पिन नंबर मारुन बदलून यावे.
३) बँकेमधून एकदम एकाच दिवशी जास्त पैसे न घेऊन जाता थोडे थोडे घेऊन जाऊन जमा करावे. ४) पैसे घेऊन जातेवेळी कामगारांना किंवा दुसऱ्यांना सांगू नये व प्रति दिवशी एका वेळी एकाच रस्त्याने न जाता रोज रस्ता बदलून जावे. जास्त रक्कम / पैसे एकटेच घेऊन न जाता सोबत दुसऱ्या परिचित व्यक्तीला बोलावून न्यावे. ५) तुम्ही बँकेतून पैसे घेऊन येतेवेळी कोणी अनोळखी व्यक्ती तुमच्या पायाखाली पैसे टाकून तुमचे पैसे पडले आहेत बघा म्हणुन तुमच लक्ष दुसरीकडे वळवून तुमच्या जवळ असलेले पैसे पळवूण घेऊन जातात या कडे तुमचे पूर्ण लक्ष असु द्या.
खिसे चोरी / पाकिटमारी संदर्भात घ्यावयाचे सावधानीचे उपाय
१) तुम्ही बसमधुन किंवा रेल्वे मधुन प्रवास करतेवेळी तुमचे लगेज / बॅग तुमच्या जवळच ठेवावे दुसरीकडे ठेवल्यास तुमचे सुटकेस किंवा बॅग बस किंवा रेल्वे थांबल्यास चोरी करून किंवा बॅग सुटकेस बदलून घेउन जाऊ शकतात. या कडे लक्ष देणे गरजेचे आहे.
२) बस किंवा रेल्वेत चढतेवेळी/उतरतेवेळी तुमच्या जवळील वस्तु पळवून घेऊन जाणाऱ्या चोरांपासून सावधान रहावे.
अशा अनेक घटना घडत आहेत यासाठी घरातील महिलांनी विशेष करून सावधगिरी बाळगावी व कर्त्या पुरुषांनीही घराबाहेर पडताना जबाबदारीनिशी आर्थिक व्यवहार करावेत असे आवाहन पोलिसांनी केले आहे अशा घटना बाबत काही अनपेक्षित घडल्यास व संशयित आढळल्यास खानापूर पोलीस स्टेशनची संपर्क साधावा अधिक माहितीसाठी….
खानापूर पोलीस स्टेशन ; सी.पी.आय. खानापूर
पी.एस.आय. खानापूर. मो. 9480804033,. मो. 9480804086, पी. एस.आय. अपराध विभागमो. 9480804129
दूरध्वनी क्र. 08336-2222333
तूर्त सेवा खानापूर मो. 112