IMG_20250426_165243

खानापूर /प्रतिनिधी:

खानापूर तालुक्यात लोककला नाट्यकला जपण्याचे काम तालुक्यातील अनेक कलाकारांनी जपले आहे. अशा कलांना जिवंत ठेवण्यासाठी प्रत्येक ग्रामीण भागातील कलाकारांना वाव देणे गरजेचे आहे. ज जांबोटी सारख्या दुर्गम भागात ही नाट्यपरंपरा जतन करत असताना जांबोटी भागातील कलाकारांनी एकच त्याला या नाट्यप्रयोगाचे अनेक प्रयोग करून दाद मिळवले आहे. आज जांबोटी येथे होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी व त्याला अर्थसहाय्य उभारण्यासाठी” एकच प्याला ” या नाट्यप्रयोगाचे आयोजन करून एक प्रकारे कलाकारांच्या प्रोत्सानाबरोबर शिवस्वराज संकल्पना ही जांबोटी येथील शिवसंकल्प संघटनेने हाती घेतली आहे, हे कौतुकास्पद असल्याचे विचार आमदार विठ्ठल हलगेकर यांनी व्यक्त केले. शनिवारी खानापूर येथील शुभम गार्डनमध्ये सायंकाळी पाच वाजता आयोजित एकच प्याला या नाट्यप्रयोगाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जांबोटीचे श्रीमंत सरकार करण सिंह सरदेसाई -जांबोटीकर होते. प्रारंभी उपस्थित यांचे स्वागत व प्रास्ताविक शिवसंकल्प संघटनेचे प्रमुख व माजी तालुका पंचायत सदस्य सौ. धनश्री सरदेसाई यांनी केले. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अरविंद पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, भूविकास बँकेचे चेअरमन मुरलीधर पाटील, श्रीकृष्ण साई प्रतिष्ठानचे अध्यक्ष के. पी. पाटील, अर्बन बँकेचे संचालक मारुती पाटील, शुभम गार्डन चे मालक राजू पासलकर, बाबा देसाई, प्रशांत लकेबैलकर, किशोर हेंबाळकर, माजी केडीपी मेंबर प्रकाश पाटील, तालुका डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डी.ए.नाडगावडा, वेदांत ग्रुपचे दत्ता देसाई आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन शिक्षक सुरेश कल्लेकर यांनी केले. तर आभार शिक्षक तुकाराम सडेकर यांनी मांडले.

पत्रकार पिराजी कुऱ्हाडे यांचा वाढदिवस सत्कार

खानापूर तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पिराजी कुराडे यांच्या 55 व्या वाढदिवसानिमित्त शुभम गार्डन येथील “एकच प्याला” नाट्यप्रयोगाच्या मंचावर मान्यवरांच्या हस्ते अभिष्टचिंतन करून शुभेच्छा देण्यात आल्या. आमदार विठ्ठल हलगेकर ,जांबोटी संस्थांचे श्रीमंत सरकार करणसिंग सरदेसाई, माजी तालुका पंचायत सदस्य धनश्री सरदेसाई, माजी जिल्हा पंचायत सदस्य जयराम देसाई, माजी आमदार अरविंद पाटील, बँकेचे चेअरमन मुरलीधर पाटील, शिवसेनेचे के पी पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि पुष्पहार अर्पण करून कुराडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

खानापूर तालुक्याच्या पत्रकारितेच्या क्षेत्रात गेल्या 30 वर्षांपासून प्रामाणिकपणे वृत्त संपादनाचे काम करत असताना अनेक सामाजिक आणि विकासाच्या प्रश्नांना देखील वाचा फोडण्याचे काम केल्याबद्दल कुऱ्हाडे यांच्या बद्दल उपस्थितांनी गौरवद्गार काढले. कुराडे हे खानापूर लाईव्ह चे संपादक तर विजयवाणी या कन्नड दैनिकाचे तालुका वार्ताहर म्हणून कार्यरत आहेत.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us