Oplus_16908288

Oplus_16908288

खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी : गेल्या सतरा वर्षापासून भारतीय सेनेत एक प्रामाणिक व कर्तव्यदक्ष सैनिक म्हणून सेवा बजावणाऱ्या तालुक्यातील आलेहोळ गावातील सैनिक सुनील मनोहर पाटील यांना लेफ्टनंट जनरल यांच्या हस्ते प्रशंशा पदक प्रमाणपत्र देऊन नुकताच सन्मानित करण्यात आले. सुनील पाटील यांच्या कर्तव्यदक्ष कार्यप्रणालीच्या कार्याबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली शाब्बासकीची थाप ही त्यांच्या गौरवास पात्र ठरली आहे. याबद्दल त्यांचे सैनिकी क्षेत्रातून नव्हे तर ग्रामस्थातूनही अभिनंदन होत आहे.

याबाबत माहिती की, आलेहोळ ता. खानापूर येथील सैनिक सुनील मनोहर पाटील हे गेल्या 17 वर्षांपासून भारतीय सेनेत आहेत. सध्या ते मध्य प्रदेश येथे आपली सेवा बजावत आहेत. त्यांनी आता हवालदार पदापर्यंत आपली मजल मारली आहे. गेल्या 17 वर्षात सुनील पाटील यांनी कर्तव्यदक्षता राखत एक प्रामाणिक सैनिक म्हणून सेवा बजावताना वरिष्ठ अधिकारी तथा लेफ्टनंट जनरल यांनी त्यांच्यावर शाबासकीची थाप दिली. व त्यांना नुकताच एका विशेष कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट सैनिक म्हणून प्रशंक्षा पदक देऊन सन्मानित केले आहे. सदर प्रमाणपत्र कमांडर इन चीफ एसएससी विभागाअंतर्गत लेफ्टनंट जनरल डी. एस. राणा यांनी हे पदक नुकताच त्यांना बहाल केले.

मध्यप्रदेश येथील आर्मी वार कॉलेज माहू या ठिकाणी नुकताच या संदर्भात प्रशिक्षण व पदक वितरण सोहळा पार पडला. मध्यप्रदेश येथील आर्मी वार कॉलेजच्या जवळपास 2000 सैनिकांच्या विविध युनिटातून अशा पदकाची निवड केली जाते. यामध्ये सुनील पाटील यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल वरिष्ठ  लेफ्टनंट जनरल यांनी यांच्या प्रामाणिकपणाची दखल घेऊन त्यांना हा पदक बहाल केला आहे याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे सुनील पाटील हे खानापूर तालुक्यातील आलेहोळ गावातील सैनिक आहेत. खरंतर आल्लेहोळ हे सैनिकांचे गाव म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी एकूण 59 कुटुंबापैकी 39 सैनिक भारतीय सेनेमध्ये आहेत. विविध पदावर सदर सैनिक सेवा बजावत आहेत.

Do Share
error: Content is protected !!
Call Us