oplus_6292480

oplus_6292480


📍 चापगाव : प्रतिनिधी
गोवा कदंबा परिवहन मंडळात सुरक्षा अधिकारी म्हणून तब्बल ३५ वर्षे प्रामाणिक व कर्तव्यनिष्ठ सेवा बजावून सेवानिवृत्त झालेल्या चापगाव येथील मनोहर रामचंद्र पाटील व त्यांच्या पत्नीचा गोव्यातील मित्रपरिवाराच्या वतीने सोमवारी (दि. ९ जून) चापगाव येथील जानकी रामचंद्र निवास येथे सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात गोवा कदंबा परिवहन मंडळातील सहकारी, मित्रमंडळी तसेच नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोहर पाटील यांच्या सेवाकाळातील कार्याचा गौरव करत त्यांच्या शिस्तप्रिय, प्रामाणिक व मनमिळावू स्वभावाचा उल्लेख केला.
कदंबा परिवहन सोसायटी, पणजीचे माजी चेअरमन बबलो शेटेकर यांनी मनोगत व्यक्त करताना मनोहर पाटील यांच्यासोबतच्या ३५ वर्षांच्या सहवासातील अनेक आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर कदंबा परिवहन परिवारात निर्माण झालेल्या पोकळीचाही त्यांनी उल्लेख केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नारायण कुऱ्हाडे होते. त्यांनी सत्कारमूर्तींच्या कार्याचा गौरव करत सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दलही कौतुक व्यक्त केले. पत्रकार पिराजी कुऱ्हाडे यांनी मनोहर पाटील यांच्या सेवाकाळाचा आढावा सादर केला. मल्लापा मारिहाळ यांनी सूत्रसंचालन करत कार्यक्रमाची रंगत वाढविली.
यावेळी रामदास खांडेपारकर, मोहन नाईक, गोविंद ए. नाईक, प्रकाश गुरव, नितेश कुडतडकर, चंद्रकांत नाईक, मारुती चोपडे, मुकुंद पाटील, डॉ. रोशन पाटील, ज्ञानेश्वर सुतार, विलास पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना मनोहर पाटील यांनी आपल्या सेवाकाळातील अनुभव कथन करत सहकारी, मित्रपरिवार व कुटुंबीयांचे ऋण व्यक्त केले. संजय पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.
छायाचित्र: चापगाव येथे आयोजित सत्कार समारंभात मनोहर रामचंद्र पाटील दाम्पत्यासोबत उपस्थित मित्रपरिवार व मान्यवर.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us