lokoli: (संकलन: पल्लवी प्रकाश चव्हाण)
- भारतीय संस्कृती ही तिच्या इतिहासाने, अद्वितीय भौगोलिक रचनेने, वैविध्यपूर्ण जनजीवनाने आणि आपली पुरातन परंपरा जपुन आकार घेत आहे. भारतीयांची देवावर असनारी श्रध्दा, सण, पूजा, धार्मिक रिती रिवाज यावर असलेला विश्वास आणि महत्व पाहिले असता या परंपरा विज्ञानाचा पुरेपूर अभ्यास करुनच बनविल्या गेल्या असाव्या, यावरुन आपले पूर्वज हे विदेशी विद्वानांहूनही माहिर असावे. आणि अशीच एक परंपरा आमच्या लोकोळी गावात वर्षानुवर्षे सुरु आहे.
- सप्त चिरंजीवांपैकी एक असलेले शक्ती आणि बुध्दीचा संगम असनारे देव, संपूर्ण सृष्टीचे कर्ता करविता असणाऱ्या श्री विष्णू तथा श्री रामाचे दुत म्हणुन जानले जाणारे महाबली हनुमान, हिंदूंचे आराध्य दैवत आहेत. हनुमंताच्या पूजेने सर्व संकट दुर होतात, शक्ति धैर्य आणि संरक्षण मिळते. आपल्यापासून नकारात्मक ऊर्जा दुर जाते. हनुमानजी विद्वान आणि प्रतिभावंत आहेत, अष्टसिध्दी व नवनिधी दाता आहेत. कधी कोणावर अर्थिक संकट येते तेव्हा हनुमानाचे ध्यान केल्याने भक्तगणांना त्याचे फळ मिळते अशी श्रध्दा आहे. लोकोळी गावात प्राचीन काळापासून प्रतिवर्षी कार्तिक महिन्यात अत्यंत भक्तीभावाने श्री मारुतीरायाची उपासना करण्याची परंपराआजतागायत चालू आहे. वाल्मिकी रामायणानुसार श्री हनुमानाचा जन्म कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला मंगळवारी झालाअसल्याचे आढळून आले आहे. आणि याच कारणामुळे लोकोळी गावात पूर्वीपासून कार्तिक महिन्यात हनुमानाचा कार्तिकोत्सव केला जात असावा.
- शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे. पण तरीही या दिवशी हनुमानाची पूजा केली जाते. असे मानले जाते की शनिवारी हनुमानाची पूजा केल्याने शनिदेव खूप प्रसन्न होतात. आणि यामुळे भक्तांचे शनिशी संबंधित सर्व त्रास दूर होतात. शनिवारी हनुमानाच्या पूजेमागे एक पौराणिक कथा सांगितली जाते, ज्यामध्ये शनीदेवाने हनुमानाला वचन दिले होते की, जो कोणी हनुमानाची पूजा करेल, तो त्याला कधीही त्रास देणार नाही. कार्तिक महिन्यातील प्रत्येक शनिवारी ग्रामदेवता असलेल्या श्री हनुमान देवतेची भक्तीभावाने सेवा केली जाते. देवाला इष्ट असणारे शेंदूर, तेल, रुईची पाने यांनी देवाची पूजा करण्यात येत आहे. आणि कार्तिक महिन्यातील शेवटच्या शनिवारी मोठ्या संख्येने भक्तगण जमुन या कार्यक्रमाची सांगता करण्यात येत आहे.
- पूवीं हनुमानाचे १०-१०चे साधे कौलारु मंदिर होते. त्यातच जी आपण दक्षिणमुखी मूर्ती पाहतो तिच मूतीं होती. सर्वसामान्यतः दक्षिण दिशा अशुभ मानली जाते. दक्षिण दिशा काल अर्थात यमराजाची दिशा मानली जाते. हनुमानजी हे कालाचे नियंत्रक आहेत. आणि यासाठीच दक्षिणमुखी हनुमानाची पूजा केल्यास मृत्यू भय आणि चिंतापासुन मुक्ती मिळते. त्यापासुन रक्षण करण्यासाठी ही शक्ती देवता गदा घेऊन उभी आहे. पुर्वी दिवस खुप हलाखीचे होते. त्या इवल्याशा मंदिरात भक्तगण त्याच भक्तीभावाने येत होते. अंधारात नारळाच्या कवटीत दिवे बसवून हनुमंताच्या ओढीने यायचे. त्यावेळी गावातील प्रत्येक कुटुंब आपापले जेवण बुट्टयांमध्ये घेऊन कार्तिक महिन्यातील शेवटच्या शनिवारी भक्तीभावाने कार्तिक दिवा प्रज्वलित करून देवाची आराधना, भजन-आरती म्हणुन तिथेच जेवन करून घरी परतायचे माणसाला परिस्थिती बदलते हे खरे आहे, त्या छोट्याशा कौलाखाली असलेला मारुतीराया गावकऱ्यांचे आराध्या दैवत बनला होता. त्याच्यावर भक्ति केलेल्या भक्तांना सफलतेचे पडसाद उमटत होते. आणि त्यामुळेच मारुतीरायाची किर्ती गावोगावी पसरण्यास वेळ लागला नाही. पण व्हायचे असे, त्या अंधारात आणि मंदिराच्या रचनेमुळे पै-पाहण्यांची गैरसोय होऊ लागली. आणि त्यानंतर मंदिराचा जीर्णोध्दार करण्यात आला. वर्षे जातील तसतशी भक्तांची संख्या देखील वाढू लागली आणि यावर विचार विनिमय करून चव्हाटा युवक संघाची स्थापना केली गेली. आणि या भक्तीला पावणाऱ्या मारुतीरायाचा कार्तिक महिन्यातील उत्सव मोठ्या उत्साहाने करण्याचे ठरवले. दानशुर व्यक्ती आणि गावकऱ्यांच्या एकजुटीन महाप्रसाद करण्याचे योजले.
- थोडेथोडके म्हणता म्हणता आज २३ वर्ष लोटली, सुमारे १०,०००० लोकांचा महाप्रसाद केला जात आहे. गावात परंपरा तशीच सुरु ठेवुन कार्तिक महिन्यात प्रत्येकजण मांसाहार वर्ज्य करुन प्रत्येक शनिवारी पहाटे मंदिरात जाऊन देवाची आराधना करतात. शनिवारी सकाळची शाळा असल्याने सारी शाळकरी मुलेही देवाचा आर्शीवाद घेऊन शाळेत जाताना दिसत आहे. कार्तिक पक्षाच्या शेवटच्या शनिवारी कार्तिकोत्सव अर्थात मारुतीचा पर्व सकाळी ७:०० वाजता हनुमान देवाचा अभिषेक आणि पुजा, सकाळी ८ ते ९ बालोपासना, दुपारी २:००ते६:०० वारकरी सांप्रदायाचे भजन, सायंकाळी ७:०० ते ८:०० कार्तिक दिवा पुजेचा कार्यक्रम त्यानंतर महाप्रसादाला सुरुवात होते. असा हा मारुती पर्व प्रति वर्षाप्रमाणे आनंद द्विगुणित करणारा ठरत आहे.