Screenshot_20230921_100719
  • बेळगाव-रायबाग : कूडची तालुक्यातील हारुगेरी येथे केस गोळा करण्यात आलेल्या युवकाचा खून करून त्याचा मृतदेह विहिरीत टाकल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली आहे . कामप्पा कोंचीकोरव (वय 17, लाळ्यानकोडी, विजयपूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. हारूगेरी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली. माहिती अशी की, कामप्पा हा गावागावांत केस गोळा करून त्याची विक्री करून तो कुटुंबाचा चरितार्थ चालवत होता.
  • काही दिवसांपूर्वी तो मित्रासमवेत हारूगेरी येथे केस गोळा करण्यासाठी आला होता. त्या वेळी येथील त्या समाजातील काही तरुणांबरोबर त्याचा वाद झाला. ‘आमच्या गावात केस का गोळा करत आहेस, ‘ असा वाद त्यांच्यात झाला. त्यातून हा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. त्याचा खून करून मृतदेह विहिरीत टाकला होता. घटनास्थळी मंडल पोलिस निरीक्षक रवींद्रन बडपकीरप्पगोळ व उपनिरीक्षक गिरीमल्लप्पा उप्पार यांनी भेट देऊन पंचनामा केला.
Do Share
error: Content is protected !!
Call Us