- खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: मराठा मंडळ महाविद्यालयात “भाऊच सँडविच”
- खानापूर: येथील मराठा मंडळ कला आणि वाणिज्य महाविद्यालयात आज “भाऊच सँडविच” या चालत्या फिरत्या हॉटेलचे उदघाटन संस्थेचे उपाध्यक्ष नागराजू यादव यांच्या हस्ते झाले. तरुण उद्यमी वैजनाथ निट्टूरकर याने हा नवा व्यवसाय खास महाविद्यालयिन विद्यार्थ्यांसाठी सुरू केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो या व्यवसायात असून यापूर्वी त्याच्या फौजी चहाची चव खुद्द क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने चाखली आहे. त्याबद्दल त्याचे यावेळी श्री. नागराजू यांनी कौतुक केले.
- आज झालेल्या उदघाटन समारंभाला संचालक परशराम गुरव, महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती जे के बागेवाडी , मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण कापोलकर, एन सी सी इंचार्ज प्रा. डॉ. इरप्पा गुरव, तरुण उद्योजक उदय कापोलकर, सचिन महाजन सर्व विभागांचे प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.