खानापूर:
ऐतिहासिक वारसा असलेल्या खानापूर तालुक्यातील हालसी येथील श्री महालक्ष्मी देवीची यात्रा येत्या 10 एप्रिलपासून मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर गावात जय्यत तयारी सुरू झाली असून, गदगा मंदिरासमोर शामियान्याचा मुहूर्तमेढ कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
यात्रेच्या यशस्वी नियोजनासाठी ग्रामस्थ आणि कमिटीने कंबर कसली आहे. मुहूर्तमेढ प्रसंगी महालक्ष्मी यात्रा कमिटीचे अध्यक्ष बाळू गंगाराम जाधव, प्रदीप परिपत्तेदार, श्रीकांत गुरव, शरीफ मुजावर, पुंडलिक कामती, संजय कामती, देसाई, संजय कामती, परशुराम मादर, अर्जुन देसाई, चंदू पटेल, ओ. एन. गुरव, वासू तळवार, यल्लाप्पा बोंबडी, नरसिंग घाडी, बडकु गुरव, गुणाजी देसाई, मल्लाप्पा देसाई आणि विठ्ठल देसाई, राजीव मादार यांसह अनेक मान्यवर आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
येत्या काळात यात्रेनिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, प्रशासकीय स्तरावरही तयारीला वेग आला आहे.