खानापूर : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण सेवा सोसायटी संचलित श्री स्वामी विवेकानंद पी.यू. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, खानापूर यांच्या वतीने नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी “फ्रेशर्स डे २०२६” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम शुक्रवार, दि. १९ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता महाविद्यालयाच्या माणिकराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष ॲड. चेतन ए. मानेरीकर हे राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. प्रणव के. पित्रे (रसायनशास्त्र विभाग, जी.एस.एस. महाविद्यालय, बेळगाव) उपस्थित राहणार आहेत.
विशेष अतिथी म्हणून विनोद मराठे (मुख्याध्यापक, एस.एस.व्ही.ई.एम. शाळा, खानापूर) तसेच सुहास व्ही. कुलकर्णी (सचिव, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण सेवा सोसायटी, खानापूर) यांची उपस्थिती लाभणार आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. पी. के. चापगावकर, मार्गदर्शक एस. एस. पाटील तसेच महाविद्यालयीन संघाच्या अध्यक्षा सौ. उज्वला के. बाचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होणार असून नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत, परिचय आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य, प्राध्यापक व कर्मचारी वर्ग यांनी सर्व विद्यार्थी, पालक आणि मान्यवरांनी कार्यक्रमास उपस्थित राहून नवागत विद्यार्थ्यांना शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन केले आहे.
Khanapur: A “Freshers’ Day 2026” event has been organized by Shri Swami Vivekananda P.U. College of Arts, Science, and Commerce, Khanapur—run by the Shri Swami Vivekananda Shikshan Seva Society—to welcome new students.
The event is scheduled for Friday, June 19, 2026, at 11:00 AM in the college’s Manikrao Deshpande Hall.
Adv. Chetan A. Manerikar, President of the Society, will preside over the function. Prof. Pranav K. Pitre (Department of Chemistry, G.S.S. College, Belgaum) will attend as the chief guest.
Special guests will include Vinod Marathe (Headmaster, S.S.V.E.M. School, Khanapur) and Suhas V. Kulkarni (Secretary, Shri Swami Vivekananda Shikshan Seva Society, Khanapur).
The event will be held under the guidance of College Principal Prof. P. K. Chapgaonkar, Mentor S. S. Patil, and College Committee President Mrs. Ujwala K. Bacholkar; the program includes a welcome for new students, introductions, and various cultural performances.
Members of the college management committee, faculty, and staff have appealed to all students, parents, and dignitaries to attend the event and extend their best wishes to the new students.