खानापूर : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण सेवा संस्थेच्या श्री स्वामी विवेकानंद पदवीपूर्व कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, खानापूर येथे कॉलेज पार्लमेंट शपथविधी समारंभ तसेच जिमखाना उपक्रमांचे उद्घाटन शुक्रवार, ७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता माणिकराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष ॲड. चेतन ए. मानेरीकर हे राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून खानापूरचे आमदार विठ्ठलराव एस. हलगेकर उपस्थित राहणार असून, सन्माननीय पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव सुहास कुलकर्णी सहभागी होणार आहेत.
महाविद्यालयातील विद्यार्थी प्रतिनिधी, कॉलेज पार्लमेंट सदस्य, जिमखाना समिती, प्राध्यापक, कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, नव्या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थी नेतृत्व, शिस्त, सेवा आणि क्रीडा उपक्रमांना या कार्यक्रमातून प्रारंभ होणार आहे.
कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी आणि सर्व मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
Khanapur: Shri Swami Vivekanand Shikshan Seva Society’s Shri Swami Vivekanand Pre-University College of Arts, Science and Commerce, Khanapur has organized the Oath-Taking Ceremony of the College Parliament and the Inauguration of Gymkhana Activities on Friday, August 7, 2026, at 11:00 a.m. in the Manikrao Deshpande Auditorium.
The programme will be presided over by Advocate Shri Chetan A. Manerikar, Chairman of the Society. Shri Vitthalrao S. Halagekar, MLA, Khanapur, will attend as the Chief Guest, while Shri Suhas Kulkarni, Secretary of the Society, will grace the occasion as the Guest of Honour.
The event will mark the formal oath-taking of the newly elected College Parliament and the launch of the Gymkhana activities for the academic year. Faculty members, student representatives, office bearers, and students are expected to participate in large numbers.
The college administration has appealed to students, parents, alumni, and well-wishers to attend the programme and make the event a grand success