खानापूर:
सालाबाद प्रमाणे खानापूर तालुक्यातील कौंदल येथे श्री माऊली देवी कार्तिकोत्सव सोहळा येथे बुधवार दिनांक 13 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत माऊली देवीची गावातून वाजत गाजत मिरवणूक व दुपारी महाप्रसाद होणार आहे सायंकाळी सहा वाजता माऊली देवीचा वार्षिकोत्सव व आरती होईल सायंकाळी साडेसात वाजता हनुमान कार्तिकोत्सव व तुळशी विवाह रात्री आठ वाजता महाप्रसाद होऊन या उत्सवाची सांगता होणार आहे. यानिमित्ताने रात्री दहा वाजता ” सह्याद्रीचा सिंह गर्जतो ” हा पोवाडा याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी सार्वजनिक आणि याचा लाभ घ्यावा असे आवाहन पंचमंडळी व ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे.