खानापूर लाईव्ह न्युज प्रतिनिधी:
जीवन विद्या मिशन’ ज्ञानसाधना केंद्र बेळगाव अंतर्गत स्वानंद योग साधना केंद्र खानापूर यांच्यावतीने सद्गुरु श्री वामनराव पै. जन्मशताब्दी महोत्सव 2024 च्या निमित्ताने समाज प्रबोधनाचा कार्यक्रम येत्या रविवार दि. 27 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी 5:30 ते रात्री 8.30 पर्यंत आयोजित करण्यात आला आहे.
खानापूर जवळील नागांना होसमणी कनेक्शन हॉलमध्ये आयोजित या कार्यक्रमात ‘सुखी जीवनाचे गुपित’ या विषयावर पुणे येथील सुप्रसिद्ध प्रबोधनकार श्री चंद्रकांत निंबाळकर यांचे प्रबोधन होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने रविवारी सायंकाळी 5.30 ते 6.30 वाजेपर्यंत हरिपाठ व संगीत जीवन विद्या कार्यक्रम होईल. सायंकाळी 6.30 ते 7.30 वाजेपर्यंत सत्कार समारंभ व रात्री 7.30 ते 8.30 असा प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी खानापूर तालुक्यातील तमाम सद्गुरु श्री वामनराव पै सदभक्ताने तसेच समाज बांधवांनी उपस्थित राहून या प्रबोधनाचा लाभ घ्यावा असे आवाहन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी सयाजी देसाई संपर्क 9481913902 सी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.