खानापूर/ प्रतिनिधी: खानापूर तालुक्याच्या सह्याद्री कपारीत अनेक पुरातन काळातील दैवते आजही इतिहासाची साक्ष देतात. प्रतिवर्षी विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी पाच दिवस चालणाऱ्या दोन शक्तीपीठांच्या वार्षिकोत्सवाला या दसऱ्याच्या मुहूर्तावर अधिक महत्त्व मानले जाते. नऊ दिवस नवरात्रीचा उत्सव साजरा करून दहाव्या दिवशी महिषासुरमर्दिनीचा हा उत्सव साजरा होतोच. पण त्याच दैवतेची तालुक्यातील शक्तीपीठे असलेली कक्केरीची श्री बिस्टम्मा देवी. व माडीगुंजीची श्री माऊली देवी होय.
माडीगुंजी कर्यातीतील ग्रामदेवता, नवसाला पावणारी देवता म्हणून ओळखले जाणारी श्री माऊली देवी तिचे महत्व अनन्य आहे. लाखो भाविकांच्या उपस्थितीत दसऱ्याच्या सिमोलंगन नंतर चालणारा पाच दिवसाचा या देवीचा उत्सव म्हणजे आदिशक्तीचा मोठा महिमा मानला जातो. बेळगाव- पणजी या राष्ट्रीय महामार्गावरील वनराईच्या कुशीत माडीगुंजी येथे वसलेली ही देवता सुप्रसिद्ध आहे. या देवीला नवदुर्गेचा अवतार मानला जातो. त्यामुळे गोवा महाराष्ट्र सह कर्नाटकातील लाखो भाविक या ठिकाणी येतात. आणि या ठिकाणची यात्रा ही एक पर्वणीच ठरते. या यात्रोत्सवाची सुरुवात शनिवार दि. 12 ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजता माऊली देवीच्या अभिषेकानंतर होणार आहे. रविवार, सोमवार, मंगळवार, दिवसभर , तुलाभार, त्यासह पारंपरिक पद्धतीने धार्मिक विधी यासह सांस्कृतिक कार्यक्रम महाप्रसादावादी कार्यक्रम होणार आहेत. बुधवार दिनांक 16 रोजी सायंकाळी चार वाजता पालखी प्रदक्षिणा झाल्यानंतर या उत्सवाची सांगता होणार आहे.
कक्केरीची श्री बिष्टम्मा देवी
याच पद्धतीने तालुक्याच्या आग्नेय कोपऱ्यावर खानापूर आळनावर या रस्त्यावर असलेली जागृती देवता श्री बिष्टामादेवी ही देखील एक नवसाला पावणारे शक्तीपीठ आहे. या बिस्टमा देवीचा महिमा आघात असून या देवीच्या दर्शना शिवाय या रस्त्यावरून ये- जा करणारे प्रवासी, भक्तगण देवीला नतमस्तक झाल्याशिवाय पुढे जात नाहीत. मात्र या देवीचा मूर्तीचा चेहरा आदिशक्तीच्या स्वरूपात नसल्याने तिला कोणत्याही फोटोत अथवा चित्रीकरणात दाखवण्यास येथील पंच कमिटीने ब बंधने आणली आहेत. त्यामुळे या देवीचा महिमा अधिकच महत्त्वाचा मांनला जातो. देवी समोर सतत दिवा तेवत ठेवला जातो. भक्ताच्या मागणीला ही देवी प्रसन्न होते असे मानले जाते. त्यामुळे केवळ खानापूर तालुक्यातीलच नव्हे तर धारवाड, आळणावर, बेळगाव भागातील अनेक भाविक या ठिकाणी लाखोच्या संख्येने उपस्थित राहतात. विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी या ठिकाणी बळी देण्याची प्रथा पूर्वीपासून आहे. पण अलीकडच्या काळात प्राणी दया संघटनेने या सामूहिक प्राणी बळी प्रथेला बनणे आणले आहेत. अन याला प्रशासनाने ही दुजोरा दिला आहे. त्यामुळे बिडी ते आळणावर दरम्यान या यात्रेच्या निमित्ताने शनिवारी पहाटेपासून होणारी गर्दी व या ठिकाणी नवस पिढीसाठी होणारी धावपळ ही वेगळीच राहणार आहे . पण अलीकडे पशु बळी या अनिष्ट प्रथेवर बंधने येत असल्याने थोडीफार नाराजी असली तरी येथील नवस पिढीसाठी अनेक जण छुप्या मार्गाने पर्याय शोधतात. देवीच्या पटांगणात त अनेक प्रकारची दुकाने, खेळणी चे साहित्य अशा पद्धतीने या ठिकाणी मोठी आरास मानली जाते आणि तितक्याच भक्तिभावाने भक्तही या देवीच्या दर्शनासाठी येतात. त्यामुळे या देवीचा महिमा आघात आहे यात शंका नाही.