खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी :
राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व लाल बहादुर् शास्त्री जयंती च्या निमित्ताने आज खानापूर भारतीय जनता पार्टी मंडल् च्या वतीने आज रेल्वे स्टेशन जवळील जागृत मारुती मंदिर येते स्वच्छता अभियान व भाजपा सदस्यता अभियान राबवण्यात आले. यावेळी राबवण्यात आलेल्या अभियानात आमदार विट्टल सो.हलगेकर भाजपा मंडल अध्यक्ष बसवराज सानिकोप, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी , लैला शुगर्स चे MD सदानंद मा.पाटील , जोतिबा रेमानी , भरमानी पाटील ,गुंडू टोपिंकट्टी ,मल्लाप्पा मारिमाळ, सुंदर कुलकर्णी, श्रीकांत इटगी,राजू रायका, किशोर हेब्बाळकर ,अपय्या कोडोळी ,प्रकाश निलजकर ,बाबा देसाई, सागर अष्टेकर, हरीश सिलवंत, कुबेर नाईक,शिवा मयेकर, रवी पाटील अन्य भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते व पदाधीकारी, शहरातील सर्व युवा कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार विठ्ठल हलगेकर, राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी देशाला स्वच्छ भारत बनवण्यासाठी केलेला संकल्प हा आदरणीय आहे. म्हणून आज महात्मा गांधीजींच्या जयंतीच्या निमित्ताने सर्वत्र स्वच्छ भारत अभियान राबवले जाते. देशात एक पाऊल स्वच्छतेकडे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी देखील या उपक्रमाला अत्यंत महत्त्व दिले असून देशाला समृद्ध सुजलाम बनण्यासाठी स्वच्छ भारत बनवण्याचा संदेश दिला आहे. आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध उपक्रम राबवत देशाला समृद्ध बनवण्यासाठी कार्य करत असताना भारतीय जनता पार्टीने देखील सदस्य अभियानाला जोर दिला असून या अभियानात प्रत्येक गावातील नागरिकांनी कार्यकर्त्यांनी युवा कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन सक्षम भाजप बनवण्यासाठी देखील कार्यतत्व करावे असे आवाहन केले.