खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत देदीप्यमान यश संपादन करणाऱ्या मराठा मंडळ संचलित ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर येथील खेळाडू विद्यार्थीनींचा आपला खेळातील दबदबा जिल्हास्तरीय स्पर्धेतही कायम राखत विविध क्रीडा प्रकारात राज्यस्तरीय खेळ खेळण्यास पात्रता फेरीत उज्ज्वल यश संपादन करून आपला पक्का इरादा निश्चित केला आहे.
बेळगाव जिल्हास्तरीय कबड्डी सांघिक स्पर्धा रामदुर्ग तालुका येथे पार पडल्या या स्पर्धेत मराठा मंडळ संचलित ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूरच्या विद्यार्थिनींनी मुलीच्या कबड्डी स्पर्धेत यश मिळवले व जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत कुमारी आरती तोरगल, साधना होसुरकर, संगीता होसुरकर. सोनाली धबाले या विद्यार्थिनींची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत निवड करण्यात आली.
जिल्हास्तरीय खो खो स्पर्धा खानापूर येथे घेण्यात आल्या जिल्हास्तरीय संघात रोशनी कंग्राळकर, माधुरी मेलगे, नीलम कक्केरीकर या विद्यार्थिनींची राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत निवड करण्यात आली.
जिल्हास्तरीय टेनिस हॉलीबॉल बेळगाव येथे घेण्यात आल्या. या टेनिस हॉलीबॉल स्पर्धेत कुमारी दीक्षा शिरोडकर, मनीषा बरूकर . सोनिया घाडी या विद्यार्थिनींची जिल्हास्तरीय टेनिस हॉलीबॉल संघात निवड करण्यात आली.
बेळगाव जिल्हास्तरीय टेनी क्वाईट सांघिक स्पर्धा खानापूर येथे घेण्यात आल्या या संघात लक्ष्मी गोरल मालाश्री पाटील संगीता होसुरकर प्राजक्ता नीडगलकर विद्यार्थिनींची राज्यस्तरीय टेनी क्वाईट सांघिक स्पर्धेत निवड करण्यात आली.
वैयक्तिक खेळात कुमारी साधना होसुरकर या विद्यार्थिनीने जिल्हास्तरीय गोळा फेक स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला व तिची राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झाली आहे.
या सर्व यशस्वी खेळाडूंचे मराठा मंडळ संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर राजश्री नागराजू यांनी विशेष कौतुक केले असून राज्यस्तरीय स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत तसेच संस्थेचे संचालक श्रीमान परशराम गुरव, श्रीमान शिवाजीराव पाटील यांनी विशेष प्रोत्साहन दिले व कौतुक केले आहे. या सर्व विजयी खेळाडूंना ताराराणी कॉलेजचे प्राचार्य श्री अरविंद पाटील. मुख्याध्यापक श्री राहुल जाधव, प्रशिक्षक श्री भरमाणी पाटील श्री भीमसेन व सर्व प्राध्यापक वर्ग आणि कर्मचारी वर्गाचे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले तर खेळाडू विद्यार्थिनींच्या सर्वाकडे क्रीडा चेअरपर्सन श्रीमती मंगलताई वाय देसाई या जातीने लक्ष देत आहेत.