खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी:
मागील वर्षापासून नव्याने सुरू करण्यात आलेल्या खानापूर शहरातील शिवस्मारक चौक येथील जिजाऊ गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दुसऱ्या वर्षीही जल्लोषात सुरुवात केली आहे. शनिवारी पूर्वहितांच्या उपस्थितीत व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मूर्ती प्तिष्ठापना व महाआरती पार पडल्या.
ಖಾನಾಪುರ ನಗರದ ಶಿವಸ್ಮಾರಕ ಚೌಕದಲ್ಲಿ ಕಳೆದ ವರ್ಷದಿಂದ ನೂತನವಾಗಿ ಆರಂಭವಾದ ಜಿಜಾವು ಗಣೇಶೋತ್ಸವ ಮಂಡಳವು ಎರಡನೇ ವರ್ಷವೂ ಸಡಗರದಿಂದ ಆರಂಭವಾಗಿದೆ. ಶನಿವಾರ ಭಕ್ತರು ಹಾಗೂ ಕಾರ್ಯಕರ್ತರ ಸಮ್ಮುಖದಲ್ಲಿ ಮೂರ್ತಿ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆ ಹಾಗೂ ಮಹಾರಥೋತ್ಸವ ನೆರವೇರಿತು.
आज उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी गणरायाच्या आरतीचा मान पोलीस प्रशासनास दिला होता. त्यासाठी बैलहोंगल डिवीजन चे डीएसपी रवी नायक , खानापूरचे सीपीआय मंजूनाथ नायक , नंदगड चे सीपीआय एस सी पाटील ,खानापूरचे पीएसआय गिरीश हे सर्व पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित त्यांच्या हस्ते मंगल आरती पार पडल्या. त्यानंतर मंडळाच्यावतीने सर्व पोलीस अधिकाऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला…
डीएसपी रवी नायक यांनी शिवस्मारक चौकातील हा गणेशोत्सव शोभा वाढवणारा आहे. खानापूर शहरात अनेक गणेशोत्सव मंडळे आहेत शिवाय ग्रामीण भागातही मोठ्या आनंदात उत्साहात हा सण साजरा केला जात आहे. प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शिस्तबद व व्यवस्थित रित्या सण साजरा करण्यासाठी उत्साह दर्शवावा. प्रत्येक मंडळाजवळ होणारी गर्दी व त्या ठिकाणी होणारे गैरव्यवहार रोखण्यासाठी प्रत्येक मंडळांनी आपापली जबाबदारी हाताळावी. असे सांगून मंडळाला शुभेच्छा दिल्या. उपस्थितांचे आभार पत्रकार वासुदेव चौगुले यांनी मानले…
यावेळी मंडळाचे अध्यक्ष भूषण पाटील यांच्यासह मंडळाचे सर्व पदाधिकारी, पत्रकार विवेक गिरी , ॲड. इश्वर घाडी, तसेच मुंबई हायकोर्ट चे वकील व खानापूरचे सुपुत्र नंद्रणकर , सुरेश जाधव, विनायक मुतगेकर, नगरसेवक तोहीद, खानापूर तालुका पंचहमी योजनेचे अध्यक्ष सुर्यकांत कुलकर्णी वगैरे सर्वजण उपस्थित होते.