पिराजी कुऱ्हाडे /खानापूर :
आयुष्यात शिक्षणाचा महत्वाचा टप्पा म्हणून दहावीच्या परीक्षेकडे (SSC Exam) पाहिले जाते. मात्र अनेकांना कुठल्या ना कुठल्या कारणावरून शिक्षणापासून (Education) वंचित रहावे लागते. अनेक जणांवर कमी वयातच कुटुंब चालवण्याची जबाबदारी येऊन पडते. त्यामुळे अनेकांना मधूनच शिक्षण सोडून द्यावे लागते. मात्र, वय वाढत असतानाही शिकण्याची ओढ काही जणांना स्वस्थ बसू देत नाही. या ओढीतूनच श्री पीटर डिसोजा यांनी तब्बल 63 वर्षांत वकिली होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.
खानापूर तालुक्याच्या माचीगड येथील छोटेखानी गावात जन्मलेले श्री पीटर ध्येयाचे पाऊल पुढे ठेवत अभियंत्यापर्यंत घेऊन एक यशस्वी उद्योजक म्हणून ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठान, बेळगाव- खानापूर पुणे मित्र मंडळ, पीपल फाउंडेशन अशा अनेक संघटनात्मक कामाचा डोलारा सांभाळत. आज वयाच्या 63 वर्षात त्यांनी वकिलीचे (BA.LLB) ज्ञान पूर्ण केले.
तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात नेहमी विद्यार्थ्यांचे उज्वल पाहणारे, पुण्यासारख्या ठिकाणी एक यशस्वी उद्योजक म्हणून जीवनात काहीही कमी नसताना अनेक मित्रपरिवार व सवंगड्यांचा गोतावळा सोबत घेत घेत वयाच्या 63 वर्षात वकिलीचे ज्ञान पूर्ण करून एक यशस्वी उद्योजक उच्चशिक्षित व्यक्तिमत्व म्हणून चमकताना दिसतो आहे.
सामाजिक व कौटुंबिक प्रगती ही फक्त शैक्षणिक प्रगतीमध्ये दडलेली आहे . हे हेरून, प्रतिष्ठित अभियंता व वकील श्री पीटर डिसोजा यानी खानापूर सारख्या दुर्गम या भागात ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठान खानापूरच्या माध्यमातून एक मोठी अशी शैक्षणिक चळवळ उभी केलेली आहे. साहेब एक सामान्य व गरीब कुटुंबातून आलेले आहेत . त्यानी प्रत्येक वेळेला आपल्या परिस्थितीचा संदर्भ घेऊनच विचार करत असतात . त्यामुळे शैक्षणिक प्रगती ही फार महत्त्वाची आहे हे समजून सतत शिक्षणासाठी विचार करत असतात व तशी भरीव मदत हि करत असतात . हे करताना ते कोणत्याच प्रसिद्धीची हाव बाळगत नाहीत . लहानपणी आपल्या आई सोबत तहसीलदार कार्यालयात गेले असता आईने सांगितलेले ” बाळ त्या पट्टेवाले सारखी तू नोकरी करशील तेवढा तू नक्कीच शिक . ” हे ते नेहमी सांगत असतात .
आज त्यानी स्वतःच्या प्रगतीबरोबरच समाजाच्या प्रगतीकडे ही पूर्णपणे लक्ष दिलेले आहे . सामाजिक व शैक्षणिक कार्य करते वेळी वैयक्तिक संबंधाकडे ही ते विशेष लक्ष देत असतात . आपल्या परिचित व जवळच्या व्यक्तीना आपल्या सर्व ज्ञानाचा पुरेपूर उपयोग व्हावा ही त्यांची मनोधारणा आदर्शवत आहे पीटर डिसूजा म्हणजे परस्थिती ची जाणीव व आयुष्याचा तारतम्याचा गाढा अभ्यासक , व सत्सत विवेक बुद्धी समाज प्रिय लहान असो वा थोर सर्वाना मान व सन्मान (Respect )देणारे प्राचीन व आधुनिक संस्कार व संस्कृती ची खान असणारे तसेच समाज समन्वय साधणारे अपमान कोणाचा न करणारे कोणी केला तरी प्रभावाने माफ करणारे पराकोटीची Patience असणारे व शिकवणारे आत्मियता व जिव्हाळ्याचे खजिना असणारे व सतत प्रयत्नवादी व कुष्टाचे मोल करणारे. चुकीच्या गोष्टींना थारा न देणारे व समाज प्रती योगदान जसे सामाजिक क्षेत्र ,शैक्षणिक क्षेत्र,आरोग्य विभाग, वृद्ध , अनाथ , गरजू विद्यार्थी यांचे आधार स्तंभ सामाजिक कार्यात सतत कार्यरत असणारे व स्वताःच्या व्यवसायिक क्षेत्रात प्रामाणीक उत्तुंग यशस्वी कामगिरी करणारे नात्यांना एकत्र जपणारे मातृपितृ भक्त , गुरुभक्त , मित्र, बंधू जपणारे असे अनमोल रत्न ज्यांचा उल्लेख करावा असे परिसाप्रमाने साहेबांच्या सानिध्यात जाईल त्यांचे सोनं करणारे अशा त्रिवार अनमोल व्यक्तीमत्वास आज कायद्याचे ज्ञान पूर्ण करत त्यांनी वयाच्या 63 वर्षात केलेल्या जीवनातील यशाच्या टप्प्यास खूप खूप शुभेच्छा.