- खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी
- गेल्या 40 वर्षापासून जंगलाच्या पायथ्याशी तसेच नगर तपासून 4 किलोमीटर अंतरावर वसलेल्या गवळी समाजाला मानवतेच्या आधाराची गरज निर्माण झाली आहे. गेल्या अनेक वर्षापासून संघर्षमय जीवन जगत काठ्याकुट्यांनी तसेच चिखलानी माखलेल्या परिसरात जीवन जगताना येथील शंभर लोकसंख्येवर असलेल्या एका गवळी समाजाची कथा वेगळीच आहे. अनेक वर्षे या ठिकाणी पक्का रस्ता वीज पाणी समस्या शाळा समस्या सोडवण्यासाठी संघर्षमय जीवन जगत असताना आमच्याकडे कोणी पाहिल का? तुमच्या समस्या कोण जाणवेल का? असा प्रश्न येथील जनतेने उपस्थित केला आहे. ही कथा आहे जीव मुठीत घेऊन जगण्यासाठीच संघर्ष करणाऱ्या नंदगडजवळील (ता. खानापूर) गवळीवाड्याची. अशा या संघर्षमय जीवन जगणाऱ्या समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. बीज, शिक्षण, पक्की घरे, रस्ता आदी मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सरसावले आहेत.
- आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या पुढाकाराने लैला साखर कारखान्याचे एमडी सदानंद पाटील, माजी जि. पं. सदस्य पुंडलिक कारलगेकर, खानापूर पीकेपीएसचे संचालक शंकर पाटील, सदानंद मासेकर आदींनी सोमवारी (दि. १७) गवळीवाड्याला भेट देऊन रहिवाशांच्या व्यथा जाणून घेतल्या. त्या टप्प्याटप्प्याने सोडविण्यासाठी प्रशासनाच्या सहकार्याने योजना आखली जाणार आहे.
- नंदगडपासून ४ कि. मी. अंतरावर डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या गवळीवाड्याची लोकसंख्या शंभरावर आहे. पंधरा ते वीस कुटुंबे गोपालन करुन गुजराण करतात. गेल्या ४० वर्षांपासून वीज, पाणी, रस्ता, शिक्षण या मूलभूत सुविधांसाठी त्यांचा संघर्ष सुरु आहे. बीज नसल्याने मुलांना घरी अभ्यास करणे अशक्य होते.
- सामाजिक संस्थांनी सोलारची सोय करून येथील अंधार दूर करण्याचा प्रयत्न केला खरा पण हा प्रयोगही अयशस्वी ठरला आहे. नंदगडपासून तलावापर्यंतचा पाणंद रस्ता चिखलाने माखला आहे. येथून पायी चालत जाणेदेखील कठीण आहे. या रस्त्याचा विकास केल्याशिवायशिक्षणासाठी सुरु असलेली फरफट थांबणार नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. अनेक गवळी कुटुंबे झोपडीवजा घरात राहतात.घरकुलाचा लाभ देण्यासाठी तालुका प्रशासन आणि नंदगड ग्राम पंचायतीकडे पाठपुरावा करण्याची हमी कार्यकर्त्यांनी दिली.
- नंदगड गवळी वाड्यावरील जनतेचे त्रास कानावर पडताच आमदार विठ्ठल हलगेकर यांनी तातडीने भेट देऊन समस्या जाणून घेण्यास सांगितले. येथील सर्व समस्या मार्गी लावल्या जातील.
- सदानंद पाटील, एमडी लैला शुगर्
- रोज शाळेला येण्या- जाण्यासाठी आठ किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. पहिली दुसरीची मुलेही चिखलातून शाळेला ये जा करतात. आता या ठिकाणी चौथीपर्यंतच्या शाळेची आवश्यकता आहे.
• श्री पुंडलिक कारलेकर , माजी जिल्हा पंचायत सदस्य