Screenshot_20240517_082906

संपादकीय:

  • लोकसभा निवणुकीच्या मतदानाचे चार टप्पे पूर्ण झाले असून सध्या ज्याच्या त्याच्या तोंडी एकच प्रश्न आहे. तो म्हणजे ही निवडणूक जिंकणार कोण? विविध वृत्त वाहिन्या, अक्षरशः हजारोंच्या संख्येने असणारे यूट्यूबर्स आणि त्यांच्या वाहिन्या, वृत्तपत्रे आणि सर्व प्रकारची प्रसारमाध्यमे सध्या या एकच चर्चेत गुंतलेली दिसतात. प्रत्येकाची अनुमाने निरनिराळी. या अनुमानांची कारणेही भिन्न. या साऱ्या गजबजाटातून एक बाब स्पष्ट होत आहे. ती म्हणजे खऱ्या अर्थाने ज्यांना निःपक्षपाती, परखड किंवा सचोटीच्या नियमांना धरुन अनुमाने व्यक्त करणारी प्रसारमाध्यमे अगदी अल्प प्रमाणात आहेत. जवळपास नाहीतच, म्हटले तरी चालेल. बहुतेक माध्यमे त्यांच्या विचारसरणीला किंवा त्यांचा राजकीय कल जसा आहे, त्यानुसार मतदान आणि इतर घटनांचे आकलन करुन घेऊन त्या आधारावर अनुमाने व्यक्त करीत आहेत. या उलटसुलट विचारांच्या गुंत्यात सर्वसामान्य माणसाला काही बोध होण्यापेक्षा त्याचा गोंधळ उडण्याचीच शक्यता अधिक आहे. तरीही, या मतमतांतरांवर दृष्टीक्षेप टाकणे आवश्यक आहे…

निवडणुकीपेक्षाही चर्चा अधिक रंगतदार..

  • लोकसभा निवडणूक तिच्या गतीने पुढे जात आहे. मतदानाचे चार टप्पे पूर्ण झाले आहेत. एकंदर 380 मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता केवळ 163 मतदारसंघांमधील मतदान व्हायचे आहे. तेही पूर्वनिर्धारित कार्यक्रमानुसार पूर्ण होईलच. मतदान प्रक्रियेनंतर मतगणनेची प्रतीक्षा करायची आहे. मतगणना 4 जूनला असून त्याचदिवशी दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होणार आहे. पण, मतगणना सोडाच, पण मतदानही पूर्ण होण्याआधी कोण जिंकणार, या विषयावर अत्यंत ज्वलंत किंवा ‘हॉट’ अशा स्वरुपाच्या चर्चा विविध वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या, युट्यूब वाहिन्या आणि प्रसारमाध्यमांवर झडत आहेत. त्या पाहिल्या आणि ऐकल्या, की, ‘बाजारात तुरी आणि भट भटीणीला मारी’ या म्हणीची आठवण झाल्याशिवाय रहात नाही. या चर्चा मधील गांभीर्य हरवल्याचे दिसते.

चर्चे पे चर्चा!…

  • 2014,2019, आणि आता 2024 या तीन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये मुख्य विषय ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी’ हाच असून ते हवेत की नकोत, या एक मुद्द्यावर देशातील मतदार विभागला गेल्याचे सर्व राजकीय विश्लेषक मान्य करतात. त्याच धर्तीवर प्रसारमाध्यमांवरील चर्चावीरांचेही ध्रुवीकरण झाल्याचे दिसते.
  • विविध माध्यमांचा या चर्चाच्या संदर्भातून आढावा घेतला असता, दोन परस्परविरोधी सूर ऐकू येतात. 1, पंतप्रधान नरेंद्र मोदी विजयाची हॅटटिक करणार. 2, त्यांना तसे करता येणार नाही याच गोंधळात आपकी बार 400 पार होणार की नाही. यावरही बऱ्याच वृत्त माध्यमातून काट्याकुत चालू आहे.
  • अशाप्रकारे अनेक वृत्त वाहिन्यावर अतिशय धारदारपणे झाल्याचे आढळून येते. प्रत्यक्ष मतदारांचे ध्रुवीकरण झाले आहे किंवा नाही, आणि झाले असलेच तर कशा प्रकारे आणि कोणत्या आधारावर आहे. हे मतगणना झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. पण चर्चेचे ध्रुवीकरण झालेले आहे.
  • लोकांनी विश्वास ठेवायचा कुणावर?
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील मुद्दे पाहता की हेच मुद्दे 2019 च्या निवडणुकीतही आता इतक्याच चविने मांडण्यात येत होते. त्यावेळच्या युट्यूब चर्चा किंवा मते आजही इंटरनेटवर उपलब्ध आहेत. या चर्चा किंवा मते पुन्हा ऐकली असता असे दिसते की, यावेळी काही परिस्थितीजन्य फरक वगळता तेच आरोप आजही केले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट नाही. बेरोजगारी व महागाई हेच मुद्दे आहेत. अशी त्या निवडणुकीच्या वेळीही आता इतकाच जोर लावून ठासवण्यात येत होते.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचंड घाबरलेले आणि भेदरलेले आहेत, असा निष्कर्ष त्यांच्या विरोधातील राजकीय पक्षांनी आणि विचारवंतांनी 2019 च्या निवडणुतही काढला होता. आजही त्याच लोकांकडून तीच भाषा केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा निवडून आले तर निवडणुकाच होणार नाहीत, हा आरोपही त्यावेळी होताच. पण असे आरोप होत असतानाही मागची निवडणूक भारतीय जनता पक्षाने अधिक मते आणि अधिक जागा मिळवून जिंकली. आता तेच आरोप त्याच व्यक्तींकडून केले जात असल्याने लोकांनी विश्वास कशावर ठेवायचा ?
  • 400 पार साठी हे करावं लागेल
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समर्थनार्थ मांडल्या. जाणाऱ्या मुद्द्यांमध्ये ‘400 पार’ हा मुद्दा टीकेचा विषय ठरला आहे. कारण राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 400 जागा मिळवायच्या असतील तर दक्षिणेत तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ आदी राज्यांमध्ये मोठे यश मिळवणे आवश्यक आहे. तशी स्थिती दिसत नाही, असे अनेकांचे मत आहे. शिवाय सध्या असलेल्या जागा टिकवून धराव्या लागणार आहेत. त्याचप्रमाणे प्रस्थापित विरोधी भावना हा मुद्दा कोणत्याही 10 वर्षे सलग सत्तेवर राहिलेल्या सरकारसाठी कळीचा असतो. त्यावर कशी मात केली जाते, यावरच त्या पक्षाचे सलग तिसऱ्या मोठ्या निवडणुकीतील यश अवलंबून असते.
Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us