मुंडगोड : उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघात यावेळी पक्षाचे सर्व कार्यकर्ते एकजूट होऊन कार्य करत आहेत सरकारच्या योजना तथा लोकांचा काँग्रेस वरील विश्वास हाच विजयाची ओळख राहणार असून लोकसभा निवडणुकीत डॉक्टर अंजली निंबाळकर ह्या भरघोस मतांनी निवडून येतील यात शंका नाही असा विश्वास क मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केला आहे. काँग्रेसच्या उमेदवार अंजली हेमंत निंबाळकर यांच्या प्रचारार्थ मुंडगोड, उत्तर कन्नड जिल्हा लोकसभा मतदारसंघात जाहीर सभेत बोलताना ते म्हणाले.
यावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, उत्तर कन्नड जिल्ह्यातील लोक राजकीयदृष्ट्या जागरूक आहेत. या भागातील लोकांना राजकारण सांगण्याची गरज नाही त्यामुळे मतदान कोणाला करायचे हे येथील मतदारांनी ठरवले असून या मतदारांचे आपण कौतुक करतो असे ते म्हणाले.
यावेळी डॉक्टर अंजली निंबाळकर यांच्या बद्दल बोलताना ते म्हणाले, मराठा समाजातील एक गृहस्थ जो व्यवसायाने डॉक्टर आहे आणि जनहिताची महिला आहे ती यावेळी तुमची प्रतिनिधी आहे. त्यांनी जास्त मतांच्या फरकाने विजयी होऊन त्यांना दिल्लीला पाठवले. संसदेत लढून तुमच्या सर्व मागण्यांना प्रतिसाद देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले.
या जिल्ह्यातील जनतेला खोटे कोण आणि कोणी भारतीयांचा विश्वासघात केला हे समजण्याइतपत ज्ञान आहे. त्यामुळे यावेळी अत्यंत जाणीवपूर्वक मतदान करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
भाजपवर टीका करताना ते म्हणाले, मला शक्ती द्या परदेशातील काळा पैसा आणून 100 दिवसांत प्रत्येक भारतीयाच्या खात्यात 15 लाख टाकण्याचा दावा करणारे मोदी दहा वर्षे तुम्हा सर्वांचे नाव घेत फिरले. असा खोटारडा चेहरा पाहून तुम्ही मतदान केले तर तुमच्या मताचा आदर होईल का, असा सवाल त्यांनी केला. वर्षाला दोन कोटी नोकऱ्या निर्माण करण्याचे आश्वासन देणारे मोदी, महागाई रोखू असे सांगणारे मोदी, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू, असे सांगणारे मोदी यांनी काहीही पूर्ण केले नाही आणि विश्वास दाखवून भारतीयांची फसवणूक केली हाताचा आरोपही त्यांनी यावेळी भाजपावर केला. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनीही भाजपवर समाचार घेतला, राज्यात सुरू असलेल्या गॅरंटी कर्ड आणि समाजाला जागृत केले असून अशाच योजना निरंतर कायम ठेवण्यासाठी काँग्रेसची साथ द्या काँग्रेस सरकार जनतेच्या हितासाठी व राज्याच्या हितासाठी कायम कार्यतत्व राहील . खोट्या भाजपवर विश्वास ठेवून देशाला अधोगती कडे नेऊ नका असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री मंकाळ वैद, माजी मंत्री व आमदार आर व्ही देशपांडे, आमदार भीमा ना नाईक, बाबासाहेब पाटील सह या भागातील आजी-माजी आमदार पक्षाचे कार्यकर्ते व मुंडगोड भागातील हजारो अजून मतदार बहुसंख्येने उपस्थित होते