खानापूर लाईव्ह न्युज: प्रतिनिधी:
- भारत देशाची वाटचाल समृद्ध देशाकडे चालली आहे. 2014 पासून भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या सरकारने देशाला महासत्ताक बनवण्यासाठी उचललेले पाऊल आजही जगभरात अभिनंदन या ठरले आहे. 2047 समृद्ध देश बनवण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या ध्येय धोरणात आहे. अशांमध्ये 2024 ची लोकसभा निवडणूक ही देशाच्या इतिहासाची निवडणूक होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भक्कम नेतृत्वासाठी व भारत देशाला भ्रष्टाचार मुक्त भारत बनवण्यासाठी प्रत्येक लोकसभा क्षेत्रातून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून आला पाहिजेत. यासाठीच उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघातून आपण मताधिक्य देऊन मला निवडून द्यावे असे आवाहन उत्तर कन्नड लोकसभा क्षेत्राचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी व्यक्त केले. चापगाव येथे मंगळवारी सायंकाळी भाजप उमेदवार विश्वेश्वर हेगडे यांची प्रचार सभा झाली. या प्रचार सभेच्या अध्यक्षस्थानी परशराम पाटील होते.
- यावेळी व्यासपीठावर आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार अरविंद पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, माजी जिल्हा पंचायत सदस्य जोतिबा रेमानी, निजद नेते नासिर बागवान, भाजप नेत्या धनश्री सरदेसाई, मंजुळा कापसे, माजी सभापती सयाजी पाटील, लेल्ला शुगरचे एमडी सदानंद पाटील, आधीवक्ते या चेतन मनेरिकर, भाजप युवा नेते पंडित ओगले, माजी उपसभापती सुरेश राव देसाई, माजी तालुका पंचायत सदस्य अशोक देसाई,पी के पी एस चे संचालक शंकर पाटील, यासह अनेकजण उपस्थित होते. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत माजी उपसभापती मल्लाप्पा मारिहाळ यांनी करून लोकसभा उमेदवार हेगडे यांच्या प्रचाराविषयी माहिती दिली. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने विश्वेश्वर हेगडे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना माजी आमदार अरविंद पाटील म्हणाले, मागील 2018 च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या हाती तालुक्याची धुरा दिल्यानंतर काय विकास केला आहे, आपल्याला ज्ञात आहे. त्यामुळे 2023 च्या निवडणुकीत जनतेने त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. आता पुन्हा लोकसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसच्या माजी आमदार निवडणूक रिंगणात आहेत. पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाला समृद्ध देश बनवण्यासाठी खानापूर तालुक्यातून भारतीय जनता पार्टीला उच्चांकी मतदान देण्यासाठी प्रत्येकाने सज्ज रहावे असे आवाहन केले.
- यावेळी बोलताना आमदार विठ्ठल हलगेकर म्हणाले, आज समृद्ध देश मोदी लाटेमध्ये विखुरला आहे. आपकी बार 400 चा नारा नरेंद्र मोदींनी दिला आहे. त्यामुळे प्रत्येक लोकसभा क्षेत्रातील निवडणुकीत उच्चांकी मतदान होणार यात शंका नाही. गेल्या दहा वर्षात देशाला उच्च स्तरावर येण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी काय प्रयत्न केले आहेत हे सर्वांना ज्ञात आहे म्हणून पुन्हा एकदा त्यांचे हात बळकट करण्यासाठी ज्याप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीत आपण भारतीय जनता पार्टीला 92 हजार मत देऊन निवडून दिलात त्याच पद्धतीचे लोकसभेसाठी खानापूर तालुक्यातून मतदान द्यावे दिले. शिवाय अनंत कुमार हेगडे खासदार असताना अनेक भागाचा विकास झाला आहे. त्यामध्ये चापगाव जळगा या रस्त्याचा केलेल्या विकासाबद्दल त्यांनी माहिती दिली.
- यावेळी बोलताना जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी भारतीय जनता पार्टी आज देशाला गरजेची आहे. देशाला तारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सारखे नेतृत्व आज काळाची गरज असून जगावर महासत्ताक देश बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करा व खानापूर तालुक्यातील विशेषता उत्तर कन्नड मधून विश्वेश्वर हेगडे यांना मताधिक्य देऊन आपण निवडून द्यावे असे आवाहन केले.
- यावेळी व्यासपीठावरून निधर्मी जनता दलाचे नेते नासिर बागवान, माजी जिल्हा पंचायत सदस्य जोतिबा रेमानी, भाजपा अधक्ष संजय कुबल, आदींनी यावेळी विचार मांडले. या सभेला नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.