IMG_20231229_154821

खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:

  • बेळगाव भागात गेल्या पंधरा दिवसापासून घर पुढच्या प्रकारात वाढ झाल्याच्या बातम्या ऐकतानाच खानापूर तालुक्यात पुन्हा त्या चोरट्याने शिरकाव केला आहे गेल्या काही महिन्यापासून बंद घराचा पाठीमागील दरवाजा तोडून घर फोडीचे प्रकार खानापूर तालुक्यातही अनेक वेळा घडले आहेत. पण गेल्या पंधरा दिवसात हे प्रकार कमी झाले व बेळगाव भागात या घरफोडीच्या प्रकारात वाढ झाल्याने जास्ती निर्माण झाली होती. पण आता पुन्हा या चोरट्याने खानापूर तालुक्यातील ग्रामीण भागाला लक्ष वेधले असून शुक्रवारी बंद घराचा पाठीमागचा दरवाजा तोडून खैरवाड तसेच कापोली केजी येथे घरफोडीची घटना घडली. आहे. शुक्रवारी सकाळी 11 ते दुपारी दोनच्या दरम्यान ही घटना घडली आहे. खैरवाड येथील पुंडलिक पोमान्ना वाकाले यांच्या घरातील सोन्या चांदीचे दागिने व 70 हजार रोख रक्कम लंपास करण्यात आली आहे. वाकाले कुटुंबीय कामानिमित्त शेताकडे गेले होते. घरात कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी लोकांची वर्दळ नसलेल्या पाठीमागच्या पाणंद रस्त्याने येऊन चोरीचे कृत्य तडीस नेले. याच दरम्यान खानापूर तालुक्यातील कापोली केजी येथे देखील घर होळीचा प्रकार घडला आहे. पाठीमागील दरवाजा तोडून येथील नामदेव कोटिनकर यांच्या घरात घुसून चोरट्यानी सामानाची मोडतोड करून पसारा केलां. पण त्यांच्या हाती काही ऐवज लागला नाही. शेवटी घरात असलेल्या दोन दारूच्या बाटल्या मात्र त्यांच्या हाती लागल्याने त्या घेऊन जाताना चोरटे विसरले नाहीत.
  • याबाबत नंदगड पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. चोरीच्या घटना थांबण्याचे नाव नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्याचबरोबर पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ಖಾನಾಪುರ ನೇರಪ್ರಸಾರ ಸುದ್ದಿ/ಪ್ರತಿನಿಧಿ: ಬೆಳಗಾವಿ ಭಾಗದಲ್ಲಿ ಮನೆಗಳ ಸಂಖ್ಯೆ ಹೆಚ್ಚುತ್ತಿರುವ ಸುದ್ದಿ ಕೇಳುತ್ತಲೇ ಕಳೆದ ಕೆಲ ತಿಂಗಳಿಂದ ಮುಚ್ಚಿದ ಮನೆಯ ಹಿಂಬಾಗಿಲು ಮುರಿದು ಕಳ್ಳರು ಮತ್ತೆ ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿಗೆ ಪ್ರವೇಶಿಸಿದ್ದಾರೆ.ಇದರಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಳ ಕಂಡುಬಂದಿದೆ. ಝಾಳೆ, ಬೆಳಗಾವಿ ಭಾಗದಲ್ಲಿ ಹೋಳಿಗೆ ಮಾದರಿಯ ಮನೆ ಆದರೆ ಇದೀಗ ಮತ್ತೆ ಈ ಕಳ್ಳ ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನ ಗ್ರಾಮೀಣ ಭಾಗದತ್ತ ಗಮನ ಸೆಳೆದಿದ್ದು, ಶುಕ್ರವಾರ ಖೈರವಾಡದಲ್ಲಿ ಮುಚ್ಚಿದ ಮನೆಯ ಹಿಂಬಾಗಿಲು ಮುರಿದು ಕಳ್ಳತನ ಮಾಡಿರುವ ಘಟನೆ ನಡೆದಿದೆ. ಶುಕ್ರವಾರ ಬೆಳಗ್ಗೆ 11ರಿಂದ ಮಧ್ಯಾಹ್ನ 2ರ ನಡುವೆ ಈ ಘಟನೆ ನಡೆದಿದೆ. ಪುಂಡಲೀಕ ಪೋಮಣ್ಣ ವಕಾಳೆ ಅವರ ಮನೆಯಲ್ಲಿದ್ದ ಚಿನ್ನಾಭರಣ, ಬೆಳ್ಳಿ ಆಭರಣಗಳು ಹಾಗೂ 70 ಸಾವಿರ ನಗದು ದೋಚಿದ್ದಾರೆ. ವಾಕಾಲೆ ಕುಟುಂಬದವರು ಕೆಲಸದ ನಿಮಿತ್ತ ಜಮೀನಿಗೆ ಹೋಗಿದ್ದರು. ಮನೆಯಲ್ಲಿ ಯಾರೂ ಇಲ್ಲದ ಸಂದರ್ಭದ ಲಾಭ ಪಡೆದ ಕಳ್ಳರು ಜನಸಂದಣಿ ಇಲ್ಲದ ಹಿಂಬದಿಯ ರಸ್ತೆಗೆ ಬಂದು ಕಳ್ಳತನ ನಡೆಸಿದ್ದಾರೆ. ಈ ಬಗ್ಗೆ ನಂದಗಢ ಪೊಲೀಸರಿಗೆ ಮಾಹಿತಿ ನೀಡಲಾಗಿದೆ. ಕಳ್ಳತನ ತಡೆಯುವ ಹೆಸರಿಲ್ಲದೇ ರೈತರು ಸಂಕಷ್ಟಕ್ಕೆ ಸಿಲುಕಿದ್ದಾರೆ. ಇದೇ ವೇಳೆ ಪೊಲೀಸರ ದಕ್ಷತೆಯನ್ನೂ ಪ್ರಶ್ನಿಸಲಾಗಿದೆ.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us