IMG-20231203-WA0037

बेळगाव / प्रतिनिधी

  • कर्नाटक सरकारने दि. ४ डिसेंबर २०२३ रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला महामेळावा होऊ नये या दृष्टिकोनातून बेळगाव शहर परिसरात १४४ कलम लागू केले आहे. तसेच कायदा – सुव्यवस्थेचे कारण पुढे करत महामेळाव्याला परवानगी नाकारलेली आहे. यासंदर्भात एक पत्र देखील त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीला दिलेले आहे. याची दखल घेऊन आज दि. ३ डिसेंबर २०२३ रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी एक बैठक घेऊन या बैठकीमध्ये शिनोळी येथे रास्तारोको कार्यक्रम करण्याचे ठरविण्यात आले.
  • यासाठी उद्या दि. ४ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता बेळगाव खानापूर निपाणी व इतर भागातील कार्यकर्त्यांनी हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाजवळ जमावे असे आवाहन समितीने केले आहे. हुतात्मा स्मारकाला वंदन करून सकाळी ११ वाजता रास्तारोको कार्यक्रमाला शिनोळी येथे सुरुवात करावयाची आहे. या कार्यक्रमास महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीने केले आहे. कर्नाटक सरकार आणि केंद्र सरकार सीमा भागातील जनतेवर जो अन्याय करत आहे त्याचा निषेध करण्यासाठी आणि महाराष्ट्र सरकारचे या सीमा भागातील जनतेकडे आणि सीमाप्रश्न सोडवणुकीकडे होत असलेले दुर्लक्ष यांचाही निषेध यावेळी करण्यात येणार आहे.

  • कर्नाटक सरकारने दिनांक 4.12.2023 रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला मेळावा होऊ नये या दृष्टिकोनातून बेळगाव शहर परिसरात 144 कलम लागू केलेले आहे आणि कायदा व सुव्यवस्थेचे कारण दाखवून मेळाव्याला परवानगी नाकारलेली आहे. या संदर्भात एक पत्र ही त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीला दिलेले आहे याची दखल घेऊन आज दी. 3 12-2023 रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक होऊन या बैठकीमध्ये शिनोळी येथे रास्ता रोको कार्यक्रम करण्याचे ठरवण्यात आले. यासाठी उद्या दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजी सकाळी दहा वाजता बेळगाव खानापूर निपाणी व इतर भागातील कार्यकर्त्यांनी हिंडलगा येथील हुतात्मा स्मारका जवळ जमावे असे आवाहन समितीने केले आहे. हुतात्मा स्मारकाला वंदन करून सकाळी 11 वाजता रास्ता रोको कार्यक्रमाला शिनोली येथे सुरुवात करावयाची आहे. या कार्यक्रमास महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन हे महाराष्ट्र एकीकरण समितीने केले आहे.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us