- खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी:
- गुरुवारी बेळगाव ज्योती कॉलेजच्या पटांगणावर लायन्स क्लब पुरस्कृत दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित 34 माध्यमिक शाळा अंतर्गत आयोजित क्रीडा स्पर्धेत चापगाव मलप्रभा हायस्कूलच्या खेळाडूंनी मुलींच्या तसेच मुलांच्या खो-खो मध्ये प्रथम पटकावून पुन्हा एकदा हायस्कूलचे नाव अव्वल केले आहे. येथील ज्योती कॉलेजच्या पटांगणावर दक्षिण म. शिक्षण मंडळ संचलित सर्व माध्यमिक शाळा अंतर्गत विद्यार्थी खेळाडूंसाठी प्रति वर्षाप्रमाणे यावर्षीही खेळांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये चापगाव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी तब्बल 34 माध्यमिक शाळा मधून पुन्हा एकदा प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. या हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी यापूर्वी जिल्हा पातळीवरील माध्यमिक शाळा अंतर्गत खो-खो स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक पटकावून शाळेचे नाव उज्वल केले होते. आज पुन्हा संस्थेच्या वतीने आयोजित क्रीडा स्पर्धेत मुलांच्या गटाने तसेच मुलींच्या गटाने खो-खोमध्ये प्रथम क्रमांक पटकावून शाबासकीची थाप मिळवली आहे. त्यांना दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजाभाऊ पाटील, सचिव विक्रम पाटील सह पदाधिकाऱ्यांच्या हस्ते, बेळगाव लायन्स क्लब च्या वतीने मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या कामी प्रयत्नशील असलेल्या शाळेचे शारीरिक शिक्षक, टी मॅनेजर यांचे तसेच खेळाडूंचे शाळा व्यवस्थापन कमिटी, शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वर्ग व पालक वर्गातून अभिनंदन होत आहे.