“”छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनकार्य आणि आजची वस्तुस्थिती-परिणाम उपाय योजना एक चिंतन”” या विषयावर व्याख्यान
(फोटो) बेळगाव : सांस्कृतिक कार्यक्रमाप्रसंगी सुमन दळवी, विद्या पाटील , स्मिता शिंदे, सुमित काळे , अरुणा पावशे, नंदिनी पाटील, श्वेता खांडेकर आणि इतर
- बेळगांव, तारीख 10 : आज सगळीकडे धार्मिक दंगे, दहशतवाद, चंगळवाद, महागाई आली आहे. देशात राजकीय स्थैर्यता राहिलेली नाही. गरीबी वाढली आहे. दुष्काळ पडला आहे. पिकांच्या नुकसानीला आणि कर्जाला कंटाळून शेतकरी आत्महत्या करतो आहे. जाती जातींत तेढ निर्माण झाली आहे. आधुनिकतेच्या नावाखाली संस्कृती दबत चालली आहे. लेकिबाळीवर बलात्कार होत आहेत. सरकारी यंत्रणा देश चालवण्यात कमी पडत आहे. चांगली विचारधारा बुरसटत चालली आहे. अश्या परिस्थितीमध्ये जेव्हा एखाद्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाची उणीव भासते, तेव्हा आपल्याला प्रकर्षाने आठवण येते ती छत्रपती शिवाजी महाराजांची. त्यांचे जेवढे अवलोकन करावे तेवढे थोडेच .निश्चयाचा महामेरू ! अखंड स्थितीचा निर्धारू ! आज त्यांच्या विचारांची,नीतीमूल्यांची भारताला गरज आहे . असे विचार
- महाराजांना अन्यायाची, तसेच भ्रष्टाचाराची त्यांना अत्यंत चीड होती. भ्रष्टाचारी व अन्यायी लोकांना त्या वेळी कडक शासन केले जात होते. हया परिस्थितीत जर शिवाजी महाराज असते तर आज कोणाला न जुमानता चालू असलेले भ्रष्टाचार, अन्याय करण्याचे कोणी धाडसच केले नसते.
- आज, महाराजांचे नाव वापरुन राजकारण करणाऱ्यांची संख्या कमी नाही. सत्ता व मतांच्या राजकारणासाठी शिवाजी महाराज फक्त आमचेच आहेत, अशी जणू स्पर्धाच लागलेली असते. वाईट एकाच गोष्टीचे वाटते की, छत्रपतींच्या नावाचा जयघोष करणाऱ्यांचा महाराष्ट्रात सुकाळ आहे, पण त्यांच्या विचारांना कृतीत आणणाऱ्या लोकांचा मात्र दुष्काळ आहे. आपण शिवचरित्र, महाराजांच्या गुणांना किती आत्मसात केले आहे? महाराज संपूर्णत: निर्व्यसनी होते. आज आपले पुढारी, राज्यकर्ते निर्व्यसनी आहेत का? आपले राज्यकर्तेच लोकांना व्यसनाच्या आहारी ढकलू पाहत आहे .त्यामुळेच राज्यकर्त्यांनी किराणा दुकानातून वाईन देण्याची घोषणा केली आहे .जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्यात येत आहेत .त्यांनी आखून दिलेली जीवनपद्धती, राबवलेली राज्यपद्धती, यांचा मात्र सपशेल विसर पडलेला आहे. ज्या शिवरायांनी महाराष्ट्रासाठी जीवनऊर्जा समर्पित केली, त्यांचे जीवनचरित्र चौकटीत बंदिस्त करण्यापेक्षा त्यांच्या चरित्रावर प्राणप्रतिष्ठा करायला हवी. त्यांचे आचार-विचार आंगिकारणे हेच आपल्यासाठी आज खऱ्या अर्थाने उत्सव ठरणार आहेत. असे विचार प्रमुख वक्त्या म्हणून ज्येष्ठ विचारवंत स्मिता शिंदे यांनी “”छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनकार्य आणि आजची वस्तुस्थिती-परिणाम उपाय योजना एक चिंतन”” या विषयावर व्याख्यान आणि गोकुळाष्टमी उसत्व सोहळा, सांस्कृतिक मनोरंजन प्रबोधनात्मक कार्यक्रम, व्याख्यान, दहिहंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
- यावेळी त्यापुढे म्हणाल्या, आज महाराज असते तर लोकशाही राज्यापाढती, धर्मनिरपेक्षता या भारताने स्वीकारलेल्या मूल्यांचे खऱ्या अर्थाने पालन झाले असते. सांस्कृतिक मुल्यांची जपणूक, सांस्कृतिक वर्षांचे जातं, कर्तव्यदक्ष शासन, स्वच्छ राज्यकारभार इत्यादींचे जतन झाले असते. भारत एक वैभवशाली राष्ट्र म्हणून नावारूपाला आले असते त्याचबरोबर परकियांच्या मनामध्ये भारताबाबत आदरयुक्त दबदबा निर्माण झाला असता.
- शिवरायांच्या नितीमुल्यांचा आजकाल तरुणपिढी अवलंब करताना दिसत नाही. काहीजण त्यांच्यासारखी दाढी वाढवून स्वतःला त्यांचे भक्त म्हणवून घेत आहेत. पण त्याने ते मावळे होणार नाहीत. त्यासाठी आधी त्यांच्यासारखे वागायला शिकले पाहिजे. शिवरायांच्या सैन्यात वेगवेगळ्या जातीचे मावळे होते. ते जातीभेद मान्य करत नव्हते. पण तरीही आज आपण त्यांना एका जातीत अडकवून ठेवले आहे. एका रंगात विभागून दिले आहे. शिवराय महाराष्ट्राचे राजे होते. म्हणून ते प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाचे आदर्श आहेत. आज भ्रष्टाचार, जातीभेद आणि दहशतवाद यांसारख्या समस्या वाढल्या आहेत. पण हे सगळं थांबवण्यासाठी शिवरायांचे विचार प्रत्येक मनामनांत पेरावे लागतील. तेव्हाच बद्दल घडून येईल. असे त्यांनी आपल्या विचार मंथनातून व्यक्त केले.
- *आदिशक्ती महिला सेवा संघ टिळकवाडी बेळगाव आणि अखिल भारतीय प्रगतिशील एल्गार सामाजिक सांस्कृतिक साहित्य परीषद बहुउद्देशीय संस्था बेळगांव व माजी विद्यार्थी संघटना बेळगांव यांच्या संयुक्तं विद्यमाने *विशेष व्याख्यान ज्येष्ठविचारवंत स्मिता शिंदे यांनी “”छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनकार्य आणि आजची वस्तुस्थिती-परिणाम उपाय योजना एक चिंतन”” या विषयावर व्याख्यान आणि गोकुळाष्टमी उसत्व सोहळा, सांस्कृतिक मनोरंजन प्रबोधनात्मक कार्यक्रम, व्याख्यान, दहिहंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिशक्ती महिला सेवा संघाच्या अध्यक्षा प्रतिभा जुवेकर होत्या.
- स्वागत उपाध्यक्षा सुमन दळवी यांनी केले. प्रास्ताविक विद्या पाटील यांनी केले. परिचय कांचन बनस्कर व प्रतिभा हावळ यांनी करुन दिला. श्रीकृष्णाची भूमिका सुमेधा काळे, राधिकेची स्मिता शिंदे , बाल कृष्णाची भूमिका तनिष्क तुपारे आणि संत मीराबाई ची भूमिका अरुणा पावशे यांनी वेगवेगळ्या एक पत्री अभिनय नृत्य आणि विविध संवादातून श्रीकृष्णाच्या लीला सादर केल्या. यावेळी गोकुळाष्टमी सोहळ्यामध्ये नृत्य गायन वादन दांडिया गरबा दहीहंडी पाळणा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. यावेळी रेश्मा सूर्यवंशी , सुजाता होसळी, उमा परदेशी आर. एन. शिंदे, वर्षा चव्हाण, कुमुद शहाकर, आर. व्हि. पाटील, सारिका सुतार, अंजली गोडसे , सुनिता चोकोर्डे, धनश्री लगाडे, नैतिक शिंदे मनस्वी खांडेकर उपस्थित होते. सूत्रसंचालन नंदिणी पाटील यांनी केले. तर आभार श्वेता खांडेकर यांनी आभार मानले. यावेळी व्यवस्थापक कमिटीचे पदाधिकारी सदस्य कर्मचारी विद्यार्थी पालक शिक्षक रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.