IMG-20230909-WA0145


मराठा मंडळ कला आणि वाणिज्य महाविद्यालय खानापूर येथे गुरुवंदना कार्यक्रम उत्साहात संपन्न

  • खानापूर लाईव्ह न्युज/प्रतिनिधि: “शिक्षक हा समाजाचा कणा असतो. शिक्षकाचे प्रतिबिंब विद्यार्थ्याच्या जीवनावर सदोदित पडलेले असते. आई आणि गुरु नंतर शिक्षकाला विद्यार्थ्याच्या जीवनात अनन्य साधारण महत्व असते. जर आई वडील आणि शिक्षकाचे योग्य मार्गदर्शन विद्यार्थ्याला मिळाले की त्या विद्यार्थ्याचे भविष्य उज्वल बनते. मीही अन्य विद्यार्थ्याप्रमाणे सामान्य विद्यार्थी म्हणूनच या महविद्यालयात आलो होतो. पण इथल्या प्राध्यापकांच्या मार्गदर्शनातून तालुक्याचा आमदार झालो. या अशा गुरुवर्याचा सत्कार करणे मी माझे भाग्य समजतो.” असे उद्गार माजी आमदार अरविदं पाटील यांनी काढले.
  • कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून रामकृष्ण मिशन आश्रमचे परमपूज्य मोक्षत्मानंद स्वामीजी बोलताना म्हणाले “आजचे युग ही विज्ञानवादी युग आहे.. जर चांगले विद्यार्थी, चांगली पिढी घडावयाची असल्यास शिक्षकाने देखील आधुनीकतेची कास धरावयास हवी. शिक्षकाने दिलेल्या या चांगल्या मार्गदर्शनाने एक निखळ समाज निर्माण होतो. एका निखळ समाजाची निर्मिती करण्याचे कार्य शिक्षक करत आसतो. मराठा मंडळ पदवी महाविद्यालयात असे विद्यार्थी घडविणारे प्राध्यापक पाहावयास मिळतात.” असे प्रशसोद्गार त्यांनी उद्घाटन प्रसंगी काढले.
  • तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना डॉ. जे. के बागेवाडी म्हणाल्या “माजी विद्यार्थी आणि कॉमर्स संघटनेने हा आयोजित केलेला कार्यक्रम उद्याच्या पिढीला गुरूबद्दलचा आदर्श दाखवून देणारा आदर्श वस्तूपाठ आहे. या दोन्ही संघटनाचे कार्य अत्यंत प्रेरणादायी असून त्यांनी असेच महाविद्यालया प्रती ऋणानुबंध जपावेत” असे त्या बोलताना म्हणाल्या.
  • महाविद्यालची कॉमर्स संघटना आणि माजी विद्यार्थी संघटना यांच्या वतीने आयोजित केलेल्या गुरुवंदना या कार्यक्रमात महाविद्यालयात सेवा बजावलेल्या पाचवीस हून आधिक प्राध्यापक वर्ग व कर्मचारी वर्गाचा सत्कार करण्यात आला. यात प्रा. एस. आर. च्योबारी, प्रा. एम. एस. कुबिहाळ, प्रा. ए. डी. काकतकर, प्रा. एस. बी. मोरब, डॉ. व्ही. आर. मळीमठ, प्रा. एस.एन कंग्राळकर,श्री. एस. एल. चौगुले, प्रा. आर. एस. पुजार, प्रा. एस. व्ही. पतंगे, प्रा. व्ही. एस. पतंगे, श्री. जे. एस. बिर्जे, डॉ. एन. एच. रामपूर, निवृत्त प्राचार्य प्रा. एस. जी. सोंन्नद, श्री. आय. टी. बडगेर, डॉ. एस. बी. दासोग, श्री. पी. एम. गुरव, श्री. आर.जी. शानभाग निवृत्त प्राचार्य. जी. वाय. बेन्नाळकर इत्यादींचे सत्कार करण्यात आले.
  • कार्यक्रमाचे स्वागत माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष श्री. वसंत देसाई यांनी केले. प्रास्ताविक निवृत्त प्राचार्य एस. जी. सोन्नद यांनी केले. तर पाहुण्याचा परिचय प्रा. संदीप पाध्ये यांनी केला. कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून हावेरी विद्यापीठाच्या रजिस्टर प्रा. व्ही. एम. तिर्लापूर, माजी विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष, व लायन्स क्लब खानापूरचे विद्यमान अध्यक्ष श्री. भाऊ चव्हाण, श्री. परशुरामआण्णा गुरव, श्री. शिवाजीराव पाटील, प्रा. पी. व्ही. कार्लेकर, श्रीमती जे. व्ही. बनोशी, सांस्कृतिक विभागाच्या उपाध्यक्षा प्रा. जे. बी. अंची उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आय. एम. गुरव यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राचार्या. शरयू कदम यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचा प्राध्यापकवर्ग विद्यार्थी वर्ग बहू संख्येने उपस्थित होता.
Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us