खानापूर लाईव्ह न्युज / प्रतिनिधी ; जागतिक व्याघ्र दिन दरवर्षी 29 जुलै रोजी जगभर साजरा केला जातो. 29 जुलै 2010 रोजी रशिया मधील सेंट पीटर्सबर्ग येथे भरलेल्या व्याघ्र परिषदेत हा दिवस जागतिक व्याघ्र दिन म्हणून घोषित करण्यात आला. त्यानुसार आज 29 जुलै 2023 हा जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जात आहे या जागतिक दिनाच्या निमित्ताने खानापूर तालुक्याच्या जंगल पट्ट्यात असलेल्या वाघांचे अस्तित्व त्याचे महत्त्व समजून घेऊया….
खानापूर तालुक्यात पट्टेरी वाघांचे अस्तित्व फार पूर्वीपासून आहे. पण, घनदाट जंगलांमुळे त्यांचा मानवाशी कधी संपर्क येत नव्हता. भीमगड अभयारण्य झाल्यापासून वाघांचे अस्तित्व जाणवू लागले. अभयारण्यामुळे वाघांची संख्याही वाढू लागली.2022 मधील व्याघ्र गणनेनुसार आज तालुक्यातील जंगलात सुमारे 12 वाघांचा वावर आहे. त्यामधील 7 वांघ निवासी असून उर्वरित स्थलांतरित आहेत. यावरून वाघांच्या बाबतीत तालुका समृद्ध असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. दरम्यान, कर्नाटक राज्यात 435 वाघ असून, देशभरात कर्नाटक राज्य वाघांच्या संख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. मध्य प्रदेश पहिल्या स्थानावर आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंततालुक्यातील जंगलात वाघांची संख्या नगण्य होती. त्यांचे अस्तित्वही फारसे जाणवत नव्हते. पण, 2011 मध्ये भीमगड अभयारण्य अस्तित्वात आल्यानंतर वन्यजीवांसह वनसंपदेतही वाढ झाली आहे. 2014 च्या व्याघ्र गणनेनुसार तालुक्यात किमान 7 वाघ होते. पुढे 2018 . च्या गणनेतही त्यांची संख्या वाढल्याचे आढळून आले. पण, 2022 च्या गणनेनुसार त्यांची संख्या 12 वर वनखात्याने व्याघ्र गणनेवेळी पोहोचली आहे. भीमगडसह कणकुंबी व लोंढा वन परिक्षेत्रात त्यांचा सर्वाधिक अढळ आहे. नागरगाळी वन परिक्षेत्रातही वाघांचा संचार आहे. पण वाघाचे अस्तित्व दिसून आले नाही. नागरगळी वन विभागाशी व्याघ्र प्रकल्प संलग्न असल्याने या ठिकाणी वाघांचे स्थलांतर होते. असे वनाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
2011 च्या व्याघ्र गणनेनुसार तालुक्यात किमान सात वाघ होते. भीमगडसह कणकुंबी व लोंढा वन परिक्षेत्रात त्यांचा सर्वाधिक आढळून आले आहेत. नागरगाळी वन परिक्षेत्रातही वाघांचा संचार आहे. पण, गणनेत याठिकाणी एकाही वाघाचे अस्तित्व असल्याचे आढळून आले नाही.
भीमगड अभयारण्य कणकूमी लोंढा भागात विविध 119 ठिकाणी कॅमेरा ट्रॅप बसवले होते. त्या आधारे वाघांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. दोन महिन्यांपूर्वी गणनेचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे.
कर्नाटकातील पश्चिम घाटाला खानापूर तालुक्यापासूनच सुरवात होते. महाराष्ट्रातील सह्याद्री अभयारण्य व दांडेलीच्या काळी व्याघ्र प्रकल्पाला जोडणारा मुख्य दुवा म्हणून खानापूरमधील जंगले काम करतात. हत्ती, वाघांसाठी हा महत्वपूर्ण कॉरिडॉर आहे. भीमगड अभयारण्य वन्यजीवांसाठी आदर्श अधिवास ठरले आहे. त्याचबरोबर वन्यजीव संरक्षण कायद्याची अंमलबजावणीही काटेकोरपणे होत असल्याने याठिकाणी व्याघ्र घनता वाढत आहे.
डॉ. संतोष चव्हाण, सहाय्यक वनसंरक्षक खानापूर
..,………,..
व्याघ्र गणना व त्याच्या नोंदी
2015-16 च्या वन्य प्राण्याच्या गणनेनुसार भीमगड, नागरगाळी, अभयारण्यासह जांबोटी आणि कणकुंबी या क्षेत्रात 7 पट्टेरी वाघांचे अस्तित्व असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यावेळेस कॅमेरा ट्रॅप आणि पायांच्या ठशांवर ही गणना झाली होती. तर, सध्या ही संख्या 12 ते 15 वर पोहोचली आहे. व्याघ्रगणना रेषा विभाजन आणि कॅमेरा ट्रॅपच्या चार पद्धतीतून केली जाते. याद्वारे वाघांची गणना प्रत्यक्ष आणि परिणामकारकपणे होते. वाघांच्या संख्ये सोबतच जंगलाची स्थिती जलचर, दुर्मिळ प्राणी, पक्षी, वनस्पती तसेच त्या परिसरात होणारा मानवी हस्तक्षेप याविषयीच्या नोंदी नोंदवल्या जातात.
लाईन ट्रांझ्याक्ट मेथड यामध्ये ठरवून दिलेल्या मार्गावर विष्ठा व पायांचे ठसे जमा करणे. तसेच, इतर वन्यप्राण्यांच्या नोंदी घेण्यात येतात. तसेच वाघाचे वास्तव्य असणाऱ्या परिसरातील वनस्पती, झाडे, पाणी आणि तिथले नागरिकांचे वास्तव्य यासंदर्भात माहिती जमा करण्यात येते. यासाठी विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक करून या व्याघ्र गणती केल्या जातात.