खानापूर लाईव्ह न्यूज/प्रतिनिधी:
हवामान खात्याच्या निर्देशनानुसार बेळगाव जिल्ह्यात येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. गुरुवारी दि.27 रोजीही जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक शाळा तसेच अंगणवाडी केंद्रांना अधिकृतरित्या सुट्टी जाहीर करण्यात आले असल्याचे बेळगावचे जिल्हाधिकारी श्री. नितेश पाटील यांनी घोषित केले आहे.
हवामान खात्याने गुरुवारी यलो अलर्ट जारी केला आहे, जो हवामानाच्या परिस्थितीशी संबंधित संभाव्य धोके दर्शवितो. त्यामुळे मुलांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हाभरातील सर्व शाळा आणि अंगणवाडी केंद्रांना सुटी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी त्यांनी आदेशात म्हटले आहे.
गेल्या शनिवारपासून सलग पाच दिवस प्राथमिक ,माध्यमिक शाळांना पावसाचा अंदाज लक्षात घेता सुट्टी देण्यात आली. हवामान खात्याने आगामी काळात कोकण, गोवा किनारपट्टीवर तसेच कर्नाटकातील बेळगाव सह अनेक भागात येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता बेळगाव जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक तसेच अंगणवाडी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
ಹವಾಮಾನ ಇಲಾಖೆಯ ಸೂಚನೆಯಂತೆ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಯೆಲ್ಲೋ ಅಲರ್ಟ್ ಘೋಷಿಸಲಾಗಿದೆ. 27ರ ಗುರುವಾರ ಜಿಲ್ಲಾ ಪ್ರಾಥಮಿಕ ಮತ್ತು ಪ್ರೌಢಶಾಲೆಗಳು ಹಾಗೂ ಅಂಗನವಾಡಿ ಕೇಂದ್ರಗಳಿಗೆ ಅಧಿಕೃತವಾಗಿ ರಜೆ ಘೋಷಿಸಲಾಗಿದೆ ಎಂದು ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಶ್ರೀ. ನಿತೇಶ್ ಪಾಟೀಲ್ ಘೋಷಿಸಿದ್ದಾರೆ.
ಹವಾಮಾನ ಇಲಾಖೆಯು ಗುರುವಾರ ಹಳದಿ ಎಚ್ಚರಿಕೆಯನ್ನು ನೀಡಿದೆ, ಇದು ಹವಾಮಾನ ಪರಿಸ್ಥಿತಿಗಳಿಗೆ ಸಂಬಂಧಿಸಿದ ಸಂಭವನೀಯ ಅಪಾಯಗಳನ್ನು ಸೂಚಿಸುತ್ತದೆ. ಹೀಗಾಗಿ ಮಕ್ಕಳ ಸುರಕ್ಷತೆ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಜಿಲ್ಲೆಯಾದ್ಯಂತ ಎಲ್ಲ ಶಾಲೆಗಳಿಗೆ ಹಾಗೂ ಅಂಗನವಾಡಿ ಕೇಂದ್ರಗಳಿಗೆ ರಜೆ ನೀಡಲು ನಿರ್ಧರಿಸಲಾಗಿದೆ. ಎಂದು ಅವರು ಆದೇಶದಲ್ಲಿ ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ.