घटनाक्रम काय आहे वाचा……
रायगड;
“रात्री दहा-साडेदहाच्या दरम्यान झालं. जमीन एकदम वाजली. आमचं घर गावाच्या एका बाजूला आहे. आम्ही जीव घेऊन पळालो. आमच्या दोन्ही घरातली दहा-बारा जणं होती.“माझ्या नणंदा, दीर, सासू असे आम्ही सगळे बाहेर पडलो. रात्रभर पावसातच राहिलो.”माझा मोठा दीर होता. त्याचं सगळं कुटुंब गेलं. फक्त एक मुलगा वाचला. धाकट्या दीराचा एक मुलगा घरातच राहिला. तो पण नाही सापडला.”हा आक्रोश आहे, रायगड जवळील इर्शाळवाडीतल्या भूस्खलनात गाडल्या गेलेल्या गावकऱ्यांच्या नातेवाईक महिलेने तेथील एका पत्रकाराला सांगितलेला तिचा अनुभव अंगाला शहारा आणणारा आहे.
इर्शाळवाडीवर बुधवारी (20 जुलै) रात्री दरड कोसळली. अन पुन्हा एकदा चार वर्षांपूर्वी झालेल्या महाराष्ट्रातील माळीन गावाची आठवण झाली. इरशाळ वाडी तालुका खालापूर जिल्हा रायगड या ठिकाणी अचानक नैसर्गिक आपत्ती मुळे 12 लोकांचा मृत्यू झाला तर सतरा घरे सापडली आहेत अजून बरीच लोक बेपत्ता आहेत. शासनातर्फे एनडीआरएफ तर्फे अनेक सुविधा त्या ठिकाणी तात्काळ पुरवल्या जात आहेत. महाराष्ट्रातील अनेक मंत्र्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहून तातडीची वैद्यकीय सेवा व मदत पुरवण्यासाठी प्रयत्न केला आहे.
गुरुवारी दिवसभर इरशादवाडीतील या घटनेमुळे संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्घटनेत रात्रीच्या सुमारास दरड कोसळण्याचा एकच आवाज अन् हादरलेले लोक जीव वाचवण्यासाठी बाहेर पडायला लागले. पण काही जण मागे राहिले, तर काही अडकले. मागे राहिलेले आपले कुटुंबीय कुठे आहेत, कसे आहेत, ते आपल्याला भेटतील की नाही याच काळजीने बचावलेले लोक व्याकूळले आहेत.
त्यांच्यातली आणि एक महिला तिचा अनुभव सांगते,
“फोन आला तेव्हा मला कळलं. आमचं घर होतं वरती. आई, भाऊ, वहिनी सगळे होते. मोठ्या वहिनीचं सगळं घरच गेलं. तिचा एक मुलगा दुसरीकडे झोपायला गेला होता, तो तेवढा वाचला.”
“असं कधीच घडलं नव्हतं. डोंगर कोसळेल असं वाटलं नव्हतं कधी, म्हणूनच तर लोक तिथे राहात होते ना…हे अचानकच झालं…कमालीची गोष्ट झाली.”
“एक मुलगा घरामध्येच अडकला. त्याला निघताच आलं नाही.”
रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी गावातील महिला आणि इतर गावातील महिला त्यांच्या कुटुंबातील लोकांसाठी आणि नातेवाईकांसाठी आक्रोश करत होत्या. आपले नातेवाईक सुखरूप आहेत की नाही हेच त्यांना माहीत नव्हतं. या दुर्घटनेत आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली असून सुमारे 103 जणांना शोधण्यात यश आलं आहे. मृतांच्या नातेवाईकांना प्रशासनाकडून पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
इर्शाळवाडी उंच डोंगरावर पायथ्याशी वसलेली आहे. इथे जाण्यासाठी रस्ता नाही. मानवली गावातून पायी जावे लागते. 48 कुटुंब वास्तव्यास आहेत. 228 लोकसंख्या गेल्या तीन दिवसात 499 mm पावसाची नोंद .सदर घटना रात्री साडे दहा- अकराच्या सुमारास घडली. जिल्हा प्रशासनाला साडे अकराच्या सुमारास माहिती मिळाल. वाडी उंचावर दुर्गम भागात असल्याने उतार जास्त असल्याने दळणवळण प्रमुख रस्त्याला जोडलेले नाही.दरड प्रवण क्षेत्रात ही इर्शाळवाडी समाविष्ट करण्यात आलेली नाही. यापूर्वी अशी कोणतीही घटना घडलेली नाही.
कुठे आहे इर्शाळगड?
रायगड जिल्ह्यात खालापूर तालुक्यातल्या चौक गावाच्या उत्तरेकडचा हा छोटा किल्ला त्याच्या सुळक्याच्या विशिष्ट आकारामुळे लगेच लक्ष वेधून घेतो. याच सुळक्याच्या भागाखाली, साधारण पूर्वेला डोंगरपठारावर इर्शाळवाडी ही आदिवासी वस्ती आहे.
याच इर्शाळवाडीवर दरड कोसळण्याची दुर्घटना घडली. हा परिसर नेमका कसा आहे? जाणून घेऊयात.
ज्या डोंगरावर हे गाव वसलं आहे, त्याच्या ईशान्येला माथेरानचा डोंगर आहे आणि पायथ्याशी मोरबे धरणाचा नवी मुंबईला पाणी पुरवणारा जलाशय आहे.
दुर्ग अभ्यासक आणि रायगड जिल्ह्यातील 59 किल्य्यांची माहती देणाऱ्या इये ‘देशीचे दुर्ग’ या पुस्तकाचे लेखक सुखद राणे यांना हा परिसर परिचयाचा आहे.
ते सांगतात की, इर्शाळगडाच्या पश्चिमेस पनवेल, वायव्येस प्रबळगड व मलंगगड, उत्तरेस चंदेरी व पेब, नैऋत्येला कर्नाळा किल्ला, दक्षिणेला माणिकगड व सांकशी हे किल्ले आहेत तर पूर्वेस खंडाळा घाट व नागफणी आहे.
इर्शाळगडाचा इतिहास
इर्शाळगडाचा इतिहासात फार कुठे उल्लेख येत नाही. पण आसपासचे गडकिल्ले आणि या परिसरातून बोरघाटाकडे म्हणजे आजच्या खंडाळा घाटाकडे जाणारी वाट पाहता, टेहळणीसाठी आणि मुख्यतः संदेशांची देवाणघेवाण करण्यासाठी या गडाचा वापर होत असावा, असं या परिसरातले इतिहास अभ्यासक सांगतात.
शिवरायांनी कल्याण-भिवंडी-रायरी पर्यंतचा मुलुख घेतला तेव्हा हा गड देखील त्यांच्या ताब्यात आला असावा, असं स्थानिक संशोधक सांगतात.
या गडाचं नाव फारसं कुठे इतिहासात घेतलं जात नसलं, तरी जवळच्या चौक गावाला ऐतिहासिक महत्त्व आहे. शिवाजी महाराजांचे सरनौबत आणि निकटवर्तीय नेताजी पालकर यांचा जन्म याच चौक गावात झाला होता.