खानापूर /प्रतिनिधी : खानापूर तालुका डॉक्टर असोसिएशन च्या नूतन अध्यक्षपदी डॉ. ज्ञानेश्वर ई. नाडगौडा यांची निवड करण्यात आली आहे.
तर तालुका असोसिएशनच्या सचिवपदी डॉ. सागर नार्वेकर, खजिनदारपदी किरण लाड यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल रविवारी खानापूर येथे नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान व मावळत्या पदाधिकाऱ्यांचा अभिनंदन कार्यक्रम पार पडला. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सुदर्शन सुळकर होते. प्रारंभी उपस्थित यांचे स्वागत डॉ. मदन कुंभार यांनी केले. यावेळी नूतन अध्यक्ष डॉ. नाडगोडा व मावळत्या अध्यक्ष पदाधिकाऱ्यांचा श्रीफळ शाल घालून गौरव करण्यात आला. यावेळी तालुका असोसिएशनचे सदस्य डाॅ.हेरवाडेकर( dentist) डॉ.सुनिल शेट्टी (dentist) डॉ.विनायक पाटील(pediatrician) डॉ.सागर चिट्टी, डॉ.शंकर पाटील, डॉ.N.L.Kadam, डॉ.वैभव पाटील, डॉ.वैभव भालकेकर,व इतर सदस्य उपस्थित होते
यावेळी बोलताना डॉ. राम पाटील म्हणाले, खानापूर तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा बजावणारे अनेक डॉक्टर्स आहेत.1992 मध्ये डॉक्टर असोसिएशनच्या संघटनेची स्थापना करण्यात आली. प्रारंभीच्या काळात मान्यताप्राप्त वैद्यकीय ठराविक डॉक्टर्स या संघटनेचे सामील होते पण अलीकडे याचा विस्तार वाढवून अनेकांना यामध्ये सामावून घेण्यात आले असल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना नूतन अध्यक्ष डॉ. नाडगौडा म्हणाले, खानापूर तालुक्यात होमिओपॅथिक ऍलोपॅथिक व आयुर्वेदिक अशा सर्व डॉक्टर्सना समाविष्ट करून संघटना करण्यात आली आहे. तालुक्यात एमबीबीएस तसेच उच्च डॉक्टरांची संख्या कमी आहे. तालुक्यात उच्च शिक्षित डॉक्टर व्हावेत यासाठी सरकारने प्राधान्य देणे गरजेचे आहे, तालुक्यात दोन-तीन उच्चशिक्षित अथवा एमबीबीएस डॉक्टर वगळता होमिओपॅथिक आयुर्वेदिक व ऍलोपॅथिक डॉक्टरांच्या वर कार्यभार आहे. वैद्यकीय सेवा देताना डॉक्टर्स हे देवदूत म्हणून रुग्णांच्या समोर जातात. रुग्णांची सेवा बजावताना अनेक वेळा कटू अनुभव हि येतात.अशावेळी संघटनात्मक काम हे सुख दुखात बांधिलकी ठरते. यासाठीच या संघटनेच्या माध्यमातून कार्य सुरू आहे.असे सांगून डॉक्टर्स रुग्णांची सेवा बजावताना एक प्रामाणिक वैद्य म्हणून काम पाहतो. वैद्यकीय सेवा देताना माफक दरात सेवा देण्यासाठी प्रत्येक जण कार्यरत असतो. पण डॉक्टर्स धनवान आहेत, असा समाजमनातील गैरसमज चुकीची आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पिराजी कुराडे ,पत्रकार अप्पाजी पाटील यांनीही डॉक्टरांच्या कार्याबद्दल कौतुक केले. यावेळी तालुका पत्रकार संघाचे सचिव प्रसन्ना कुलकर्णी, पत्रकार हनमंत गुरव, सुहास पाटील उपस्थित होते