समृद्धी महामार्गावर खासगी प्रवाशी बसला अपघात होऊन बसने पेट घेतल्याने बसमधील २१ जणांचा मृत्यू झाला. या भीषण अपघाताची भयावहता दाखवणारे काही फोटो समोर आले आहेत.हा भीषण अपघात सिंदखेड राजा नजीक पिंपळखुटा फाट्याजवळ पहाटे दीड वाजेच्या सुमारास घडला. या भीषण अपघाताचे फोटो समोर आले आहेत.नागपूरवरून खासगी प्रवाशी बस ही पुण्याला जात होती. सिंदखेड राजा नजीक बसचे टायर फुटल्याने ही बस रस्त्यावर उलटली. या दरम्यान सिमेंट रस्त्यावर घर्षण होऊन बसने पेट घेतला.पेटत्या बसमधून प्रवाश्यांना बाहेर पडता न आल्याने यात ही मोठी जीवितहानी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
बसमधील प्रवाशांचा जळून कोळसा झाल्याने मृतकांची ओळख पटवणे अवघड काम झाले आहेत.विदर्भ ट्रॅव्हल्सची एमएच २९ बीई-१८१९ क्रमांकाची ही बस नागपूर वरुन पुण्याकडे जात होती. ३० जून रोजी नागपुर वरून सायंकाळी ५ वाजता पुण्यासाठी ही बस निघाली होती.जुलै च्या रात्री १.२२ मिनिटाने धावत्या गाडीचे समोरील टायर अचानक निघाल्याने ट्रॅव्हल्स समृद्धी महामार्गावरील पुलावरील दुभाजकाला धडकून पलटी झाली.