बेळगांव : पूर्वी पोर्तुगीज वसाहत, पाम फ्रिंज्ड समुद्रकिनारे, सोनेरी वाळूचे मैल, हिरवेगार देश, सांस्कृतिक वारशाचे अविश्वसनीय मोज़ेक, भव्य चर्च, मंदिरे, किल्ले आणि स्मारके आणि एक अद्वितीय सांस्कृतिक संश्लेषण यासह विविध आकर्षणांनी संपन्न आहे. अद्वितीय सांस्कृतिक संश्लेषण ने आकर्षलेला गोवा-गोमंतकियांची खाण आहे. पूर्व आणि पश्चिम.गोवा हे भारताचे उष्णकटिबंधीय नंदनवन आहे. गोव्यातील सुमारे 20% जमीन भारताच्या सुंदर पश्चिम घाटात येते, एक विस्तीर्ण पर्वतराजी आणि जैवविविधतेचा खजिना आहे. येथील जंगले विदेशी वन्यजीवांनी भरलेली आहेत, ज्यात भारतीय राक्षस गिलहरी, मुंगूस, स्लेंडर लॉरिस, भारतीय मकाक आणि स्लॉथ अस्वल यांचा समावेश आहे.स्थानिक गोवा आनंदी आणि सुंदर आहेत. गोवा म्हणजे फेसाळणारा समुद्र….! किनाऱ्यावर पसरलेली सोनेरी वाळू….! झाडाबेटांची मांदियाळी….! मंदिर , वर्षांची रेलचेल….! उत्सव सण यांची रेलचेल …! हा सामान्यपणे असणारा समाज अधिक दृढ येथील कवी कवित्री ने लेखक लेखिकांनी अतिशय सहज उगवत्या साहित्यातून वाङ्मयातून व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो आनंद आपल्या कवितेतून उमटवला जातो असे प्रतिपादन गोवा येथील जेष्ठ समाजसेविका आणि साहित्यिका कवयित्री प्रा. अंजली चितळे यांनी बेळगाव येथील कार्यक्रमात केले.
अनगोळ येथील लोकमान्य ग्रंथालयाच्या साने गुरुजी सभागृहात नुकताच लोकमान्य ग्रंथालयात हा कार्यक्रम झाला. लोकमान्य ग्रंथालय, शब्द गंध कवी मंडळ, वाङमय चर्चा मंडळ, सरस्वती वाचनालय, राणी पार्वतीदेवी कला व वाणिज्य महाविद्यालय मराठी विभाग, मंथन महिला मंडळ सामाजिक संस्थेतर्फे यांच्या संयुक्त विद्यमाने गोव्याहून आलेल्या सात कविंनी
कवी मोहनराव कुलकर्णी, कवी प्रा. प्रकाश क्षिरसागर, कवयित्री प्रा. चित्रा क्षीरसागर, कवयित्री प्रा. शर्मिला प्रभू, कवयित्री अंजली चितळे, कवयित्री आसावरी कुलकर्णी, कवयित्री रजनी रायकर यांनी कवितांच्या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वांग्मय चर्चा मंडळाचे ज्येष्ठ कार्यकारणी श्री. अनिल पाटणेकर होते.
प्रारंभी प्रस्ताविक लोकमान्य ग्रंथालयाचे प्रमुख जगदीश कुंटे यांनी केले. स्वागत शब्द गंध कवी मंडळाचे कवयित्री अश्विनी ओगले यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून राणी चन्नम्मा विद्यापीठाचे निवृत्त मराठी विभाग प्रमुख डॉ विनोद गायकवाड, जगदिश कुंटे, प्रा. अनिल परणेकर, प्रा. सुभाष सुंठनकर, साहित्यिका माधुरी शानभाग, प्रा. स्वरुपा इनामदार, प्रा निलेश शिंदे, प्रा अशोक अलगोंडी , सुधिर जोगळेकर, किशोर काकडे, जगदीश कुंटे , वंदना कुलकर्णी, अश्विनी ओगले, रेखा गद्रे, उर्मिला शहा, व्हि. इस. वाळवेकर, चंद्रशेखर गायकवाड, आरती आपटे, रंजना कारेकर, अनिल पाटील, उदय पाटील पाटील, अजित पाटील, श्रीधर पाटील, हर्षदा सुंठनकर, प्रा. परसू गावडे, अस्मिता आळतेकर, सुधाकर गावडे, राजाराम हलगेकर, सुधीर जोगळेकर, रंजना कारेकर , पुष्कर ओगले, तसेच लोकमान्य ग्रंथालय, वांडग्मय चर्चा मंडळ, शब्दगंध कवी मंडळ, वरेरकर नाट्य मंडळ, सरस्वती वाचनालय, मंथन महिला मंडळ व सामाजिक संस्थेतर्फे उपस्थित असलेले सर्व संस्थांचे पदाधिकारी सदस्य कर्मचारी कवी कवयित्री शिक्षक प्राध्यापक विद्यार्थी पालक रसिक हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रा.अशोक अलगोंडीनी मानले.
गोमंतकीय कवितांनी काव्यसंध्या रंगली “नजर से नजर मिला के देखो,दिल की बात बता के तो देखो” अशी सुरुवात करीत सौ.चित्रा क्षीरसागरजीनी आपल्या टीमसह कविता व सुत्रसंचलनाद्वारे काव्य संध्या रंगतदार केली. सर्व संस्थांच्या प्रतिनिधींनी कवींचे पुष्प व पुस्तक देउन स्वागत केले.प्रा.अंजली चितळे,श्रीमती आसावरी कुळकर्णी,श्रीमती रजनी रायकर,शर्मिला प्रभू,चित्रा क्षीरसागर,श्री.मोहनराव कुलकर्णी आणि श्री.प्रकाश क्षीरसागर यांनी गोव्याच्या मातीशी, संस्कृतीशी आणि सद्य परिस्थिती संबंधी सुंदर कविता सादर केल्या.देवभुमी गोवा म्हणजे सन,सैंड व केवळ बिचीस नाही तर आम्ही सह्याद्रीची पोरं व बरंच काही हे त्यांनी कवितांतून मांडलं.म्हादई,मांडवी,लईराईदेवी,म्हार्दोळ,
मंगेशी,धोंड,सुशेगात, सुरमई आमटी,आंबा,काजू,
नारळ,फणस,बांगडे, माट ली अशी गोमंतकीय खास आठवण करुन दिली. आताशा पोरी भूतकाळात रमत नाहीत, भातुकली खेळत नाहीत, प्रा अंजली चितळे भविष्याचा वेध घेत,वर्तमानावर स्वार होतात,अशा शब्दांत सांगता करण्यात आली. कार्यक्रम हाऊसफुल्ल झाला.सर्व कविंनी सर्व संस्थांचे व बेळगावकरांचे आभार मानले.सर्व कवी हे स्वतः उद्योजक अथवा चांगल्या पदांवर काम करीत असून, अनुभवी व अनेक पुस्तकांचे कवी-लेखक आहेत.कवी मोहनराव कुलकर्णी, कवी प्रा. प्रकाश क्षिरसागर, कवयित्री प्रा. चित्रा क्षीरसागर, कवयित्री प्रा. शर्मिला प्रभू, कवयित्री अंजली चितळे, कवयित्री आसावरी कुलकर्णी, कवयित्री रजनी रायकर यांनी वेगवेगळ्या गोमंतकीय कवितेतून सारे भावा विश्वास उलगडून दाखविले.