Screenshot_20230608_165053

खानापूर : खानापूर तालुक्यातील अशोक नगर येथील एका महिलेने घरच्या आर्थिक चणचणीला कंटाळून शेतवळीत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली आहे.

आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव दोड्डव्वा चंद्राप्पा उपाशी (वय 45) असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार श्रीमती दोड्डवा चंद्रापा उपाशी या आपल्या प्रतिकूल परिस्थितीत घरच्या संसाराचा रणगाडा सांभाळत जगत होत्या. राहण्यासाठी घरकुल बांधले होते. ग्रामपंचायतीतून वेळीच बिले मिळाली नसल्याने उसनवार करून उपजीविका जगवत होत्या. देणेकरीनी तगादा लावल्याने त्या आर्थिक विवंचनेत होत्या असे कळते. त्यामुळे त्यांनी गुरुवारी सायंकाळी आपल्या शेतवडीत जाऊन झाडाला दोरी लावून गळपास केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. गुरुवारी सकाळी खानापूर येथील शासकीय रुग्णालयात तिचा मृतदेह शैल्यचिकेचेसाठी आणून उत्तरीय तपासणीनंतर दुपारी अशोकनगर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या पश्चात एक मुलगा एक विवाहित मुली सून नातवंडे असा परिवार आहे.

ग्राम पंचायत मधून घरकुलाची बिले अदा ?

सदर महिलेने ग्रामपंचायतीमधून मंजूर झालेल्या घरकुलाची एकही बिले मिळाली नसल्याने आर्थिक विवेचनेतून आत्महत्या केल्याची चर्चा आहे. पण ग्रामपंचायतीच्या विकासाधिकाऱ्याने यासंदर्भात आपला खुलासा दिला असून सदर महिलेला मंजूर झालेल्या घरकुला च्या एकूण बिलापैकी आतापर्यंत जवळपास 60 हजार रुपये यापूर्वीच महिलेच्या खात्यावर जमा झाले असल्याची माहिती नेरसे ग्रामपंचायतच्या विकास अधिकाऱ्यांनी दिली आहे. यासंदर्भात सदर महिलेला जमा झालेल्या बिलाची चित्रफीत त्यांनी दिली आहे. त्यामुळे पंचायतीच्या घरकुलाच्या बिलामुळे आत्महत्या हा अर्थ चुकीचा असल्याचे दिसून येते.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us