बेळगाव:
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ बेळगांव आणि ज्योती करियर अकॅडमी बेळगाव, भाऊराव काकतकर महाविद्यालय बेळगाव, ज्योती पदवी पूर्व महाविद्यालय बेळगाव, वाय. सी. एम. यु . आणि माजी विद्यार्थी संघटना बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयएएस 2023-24 परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थींचा सत्कार-सन्मान सोहळा आणि मार्गदर्शन शिबिर, आणि व्याख्यानाचे आयोजन असा संयुक्त कार्यक्रम सोमवार दिनांक 5 जून 2023 रोजी सकाळी 11 वाजता भाऊराव काकतकर महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळचे उपाध्यक्ष आणि साप्ताहिक राष्ट्रवीरचे ज्येष्ठ संपादक, महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते व मार्गदर्शक सल्लागार ॲड. राजाभाऊ पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रारंभी वृक्षाला पाणी घालून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला काय कार्यक्रमाला चालना दिली. व्यासपीठावर
याप्रसंगी आयएएस परीक्षेत उत्तीर्ण झालेले बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील श्रृती यरगट्टी ( AIR – 362 ALL INDIA RANK ) , यासोबत डेप्युटी डायरेक्टर स्टेट अकाउंटंट अँड ऑडिट डिपार्टमेंट कर्नाटक गव्हर्नमेंट प्रोबेशनरी श्रीमती नाझिया इकबाल पटवेगार आणि युनियन बँक ऑफ इंडिया अँड स्टेट बँक ऑफ इंडिया या परीक्षेत उत्तीर्ण झालेली अधिकारी प्रतीक्षा पाटील , रेल्वे विभागात अधिकारी आणि टीसी म्हणून कार्यरत असलेले प्रकाश पाटील, यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यासह विविध परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थींचे मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला ; आणि याप्रसंगी यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान व मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले. कार्यक्रमाच्या शुभप्रसंगी दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. विक्रम एल. पाटील, भाऊराव काकतकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन. पाटील, ज्योती करिअर अकॅडमीचे संचालक आणि समन्वयक प्रा. अमित सुब्रमण्यम, ज्योती पदवी पूर्व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. डी. शेलार, बीसीए महाविद्यालयाचे प्राचार्य आनंद पाटील, बीबीए महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बसवराज कोळुचे, निवृत प्राचार्य डॉ. डी. एन. मिसाळे, कवी प्राध्यापक निलेश शिंदे, प्रा. डॉ. आय. बी. वसुलकर, प्रा. डॉ. डी. टी.पाटील, प्रा डॉ निता पाटील, प्रा. डॉ अनिता पाटील, प्रा. डॉ. एम. एस.पाटील, माजी विद्यार्थी संघटनेचे समन्वयक प्रा. डॉ.एम. व्ही. शिंदे, ए.के.पाटील उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक बी.के. कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. एन. पाटील यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. शुभम चव्हाण यांनी करून दिला. सूत्रसंचलन शिवानी गायकवाड यांनी केले. तर ज्योती करिअर अकॅडमीचे संचालक प्रा. अमित सुब्रमण्यम यांनी आभार मानले. यावेळी शिवानंद यरगट्टी, अरुण यरगट्टी, प्रा. डॉ. अमित चींगळी, प्रा. सूरज पाटील, प्रा. नारायण तोराळकर, योगेश मुतगेकर, अझर मुल्ला क्रांतीराज तज्ञावंत, पुंडलिक गावडा सुरज पाटील
तसेच दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी कर्मचारी आणि समाजातील नामवंत मान्यवर मंडळी व रसिक उपस्थित होते.
आय ए एस ऑफिसर श्रुती एरगट्टी यावेळी आपल्या भाषणातून बोलताना म्हणाल्या, गेल्या सतरा वर्षापासून मी अध्ययन करतो ते अनेक वेळा असंख्य ठिकाणी परीक्षा दिल्या पण अपयशाला सामोरे जावे लागले वेळोवेळी आणि शेवटी आयएएस परीक्षा उत्तीर्ण झालो तो माझ्या जीवनातील अतिशय अविस्मरणीय महत्त्वाचा दिवस आहे यामुळे त्याचा आनंद मी कसा वेळोवेळी आनंद व्यक्त करतो.
इयत्ता चौथी मध्ये प्राथमिक शाळेत शिकत असताना माझ्या चौथीतल्या प्राथमिक शाळेतील सिद्दू बजंत्री सरांनी माझ्या जीवनात आय ए एस परीक्षा मी द्यावे आणि ऑफिसर व्हावे ही इच्छा त्यांनी व्यक्त केली आणि तेव्हापासून माझ्या मनात परीचे संदर्भात जागा करून राहिली आणि तेव्हापासून एक वेगळ्या प्रकारचा अभ्यास मी करत गेलो आणि हेच दिवस माझ्या नवीन बदल होत गेले अतिशय गरीब कुटुंबात माझे दिवस गेले अनेक दुर्गम भागामध्ये ग्रामीण प्रदेशात मी शिकले राहिले आणि ते जीवन अनुभवले यातून मला एक वेगळी दिशा मिळाली जीवनामध्ये अनेक संघर्ष आहेत ते संघर्ष माझ्या वेगळ्या जीवनाला कलाटणी देण्यासाठी भाग पाडले जीवनात असंख्य असे चॅलेंज झाले असंख्य वादळ आले संकट आले तरीसुद्धा मी खचून गेलो नाही ती संकट मी स्वीकारत त्याच्यावरती मात करत पुढे वाटचाल केली असे त्यांनी आपला अनुभव सांगितला.जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास, प्रयत्न, सातत्य, कष्ट, सहनशीलता, ध्येय आणि शेवटी यश या सर्व गोष्टी केवळ अधिकारी होण्याकरिताच लागू होतात.
नाझिया पटवेगार म्हणाल्या,
यश हे प्रत्येकाने ऐकलेलं आहे पण ते यशाचा आनंद घेत असताना तो अनुभव मात्र वेगळाच असतो त्यातला स्व अनुभव अतिशय आपल्या मनाला वेगळे पण निर्माण करते.
जीवनात अनेक महत्त्वाच्या गोष्टी शिकायच्या असतील तर अध्ययन शिवाय पर्याय नाही आणि त्या समजून घेऊन आत्मसात करणे अत्यंत गरजेचे आहे.
जीवनातल्या वाटेवर यशस्वी होत असताना शिस्त सेल्फ कंट्रोल सोशल माध्यमाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न चाललेला आहे तो दूर करून अनेक डिस्ट्रक्शन पासून दूर राहिले पाहिजेत तरच यशस्वी होण्यासाठी आपल्याला नक्कीच सहकार लागू शकते
चांगले कोणते वाईट कोणते खरे खोटे कोणतेही शोधण्याची वृत्ती संशोधक आणि अभ्यासकांनी ठेवली पाहिजे तरच आपला जीवनपट उंचावू शकतो आणि आपल्याला यश मिळू शकते अनेक विचित्र असे प्रकार पाहायला मिळतात यासाठी प्रत्येक क्षेत्रामध्ये एक वेगळे प्रकारे मजल मारायचे असेल तर ध्येयवेढे असे कार्य करून आपल्या अध्ययनात आपला ठसा उंटायला हवा आणि संशोधन वृत्ती ठेवायला हवी. असे त्यांनी सांगितले यावेळी विद्यार्थी वर्ग प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.