बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील अठरा विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी चे जवळपास 15 विधानसभा क्षेत्रात आमदार निवडून आणण्याचा मानस भारतीय जनता पार्टीने घेतला आहे यामुळे निवडणुकीचे रणांगण सुरू झाले आहे बेळगावात सोमवारी जिल्हास्तरीय कोर कमिटीची बैठक केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या नेतृत्वाखाली पार पडली या बैठकीत जिल्ह्यातील विविध विधानसभा क्षेत्रात उमेदवारांची चर्चा कोर कमिटीच्या बैठकीत करण्यात आली. या बैठकीला भाजपचे राज्यपादक निर्मल कुमार सुराणा राज्यसभा सदस्यांना कडाडी, यांच्या उपस्थितीमध्ये बेळगाव शहर ग्रामीण आणि चिकोडी अशा तीन संघटनात्मक जिल्ह्याच्या या संयुक्त कोर कमिटी बैठकीचे नेतृत्व केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि भाजपचे उपाध्यक्ष निर्मलकुमार सुराणा यांनी केले जिल्हास्तरीय भाजप कोर कमिटीच्या या बैठकीस माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी आणि माजी जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी उपस्थित होते. या खेरीज जिल्ह्यातील अकरा मतदार संघामधील भाजपचे विद्यमान आमदार दोन खासदार आणि एक राज्यसभा सदस्य बैठकीस उपस्थित होते. विधानसभा निवडणूकीसाठी जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून तीन इच्छुकांची निवड केली जाणार असून त्यांची यादी राज्य निवड समितीकडे पाठवली जाणार आहे, बैठकीनंतर प्रसारमाध्यमासी बोलताना केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की बेळगावचे सर्व 18 मतदार संघ भाजपने जिंकले पाहिजेत यासाठी राज्यस्तरीय कोर कमिटीत येत्या दोन दिवसात चर्चा करून बेळगाव व बेंगलोर येथील प्रमुख असलेल्या दोन जिल्ह्यातील उमेदवारांची पहिली यादी येत्या 8 एप्रिल रोजी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती माहिती केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी प्रसार माध्यमांना दिली,