खानापूर :
विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेनेची उमेदवारी कर्नाटक राज्य उपाध्यक्ष आणि साई कृष्ण सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष के. पी. पाटील यांना जाहीर करण्यात आली आहे. शनिवारी मुंबई येथे शिवसेना नेते आणि खासदार अनिल देसाई यांनी त्यांना बी फॉर्म सुपूर्द केला. पाटील यांनी शनिवारी खासदार संजय राऊत आणि इतर सेना नेत्यांची भेट घेऊन दिले.
आगामी विधानसभा निवडणुकी विषयी चर्चा केली. यावेळी मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेनेने पूर्ण ताकदीनिशी खानापूरची जागा लढवण्याची तयारी केली असल्याची माहिती पाटील यांनी शिवसेनेच्या नेत्यांना दिली. निवडणुकीच्या प्रचारासाठी खासदार राऊत, युवा नेते आदित्य ठाकरे, सुषमा अंधारे आदींना त्यांनी निमंत्रण दिले आहे.
श्रीमान के पी पाटील हे कर्नाटक शिवसेनेचे राज्य उपाध्यक्ष म्हणून काम करत आले आहेत. बेळगाव जिल्ह्यात त्यांनी आपला चांगलाच नेटवर्क वाढवला आहे. खानापूर तालुक्यातही गेल्या चार-पाच वर्षापासून त्यांनी जनमानसात समाजसेवा हाती घेतली आहे. मागील 2018 च्या निवडणुकीतही त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. आता शिवसेनेच्या उमेदवारीवर निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी महाराष्ट्रातील शिवसेना प्रमुखांना भेटून आपली कैफियत मांडून खानापुरातून उमेदवारी मिळवली आहे.