खानापूर : तालुक्यातील 10 विद्यार्थी नव्या राष्ट्रीय शिक्षण नीतीचे शिकार
2022 23 शैक्षणिक वर्षातील पदवी महाविद्यालयाच्या परीक्षेला नुकताच प्रारंभ झाला आहे परंतु पदवी महाविद्यालयातील जवळपास 150 हून अधिक विद्यार्थ्यांना ऐनवेळी हॉल तिकीट मिळाले नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया गेले. यामध्ये खानापूर तालुक्यातील विविध पदवी महाविद्यालयातील जवळ जवळ 10 विद्यार्थी नवीन राष्ट्रीय शिक्षण नीतीचे (NEP) चे बळी ठरले आहेत. त्यामुळे विद्यार्थी वर्गातून आक्रोश निर्माण झाला आहे.
याबाबत माहिती की,पदवी महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षाना कालपासून सुरुवात झाली आहे शिक्षण खात्याच्या नवीन राष्ट्रीय शिक्षण नीतीमुळे बारावी नंतर महाविद्यालयात प्रवेश मिळविताना कसरत न करता प्रवेश प्रक्रिया सुलभ व्हावी याकरिता राज्य सरकारने UUCMS नावाचे संगणक वेबसाइट तयार केले. त्यामुळे विद्यार्थी त्या वेबसाइटच्या माध्यमातून प्रवेश घेतात. पुढे प्रवेशकर्त्या विद्यार्थ्याला लॉगिन आयडी आणि पासवर्ड दिला जातो. त्यामार्फत विद्यार्थी विषय निवड, परीक्षा शुक्ल भरून परीक्षेला अर्ज देखील करू शकतो. असे सर्व विद्यार्थ्याच्या हिताचे वाटत असले तरी संगणकावर अवलंबून असलेल्या या प्रणालीवर बहुसंख्य विद्यार्थ्याचा विश्वास उडाला आहे.
देशात नवीन राष्ट्रीय शिक्षण नीती (NEP) चा स्वीकार करणारे पहिले कर्नाटक राज्य ठरले असले तरी या नव्या शैक्षणिक पद्धतीचा अवलंब करत असताना विद्यार्थी आणि महाविद्यालय पुरते रुळले नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. मात्र वेबसाइटच्या व्यस्ततेमुळे राणी चन्नमा विद्यापीठातील बेळगाव जिल्हयातील जवळ जवळ दीडशेहून अधिक विद्यार्थी चालू सेमिस्टर परीक्षेपासून वंचित राहिले आहेत. यातील दहा विद्यार्थी खानापूर तालुक्यातील विविध पदवी महाविद्यालयातील आहेत. सदर विद्यार्थी राणी चन्नमा विद्यापीठातील कुलगुरू आणि अन्य वरिष्ठ अधिकार्यांयना भेटून वेबसाइटच्या व्यस्ततेमुळे आमचा परीक्षेचा अर्ज घेतला गेला नाही. आम्हाला परीक्षेला बसण्याची संधि द्यावी असे निवेदन घेऊन गेले असताना, विद्यार्थी आणि महाविद्यालयच याला जबाबदार असल्याचे सांगत विद्यापीठाने आपली जबाबदारी झटकली आहे. या विद्यापीठिय वर्तनाने वर्षभर अध्ययन करूनही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले आहेत. वरिष्ठ अधिकार्यारनी विद्यार्थ्यांच्या भावनांना समजून न घेता चालविलेला हा मनमानी प्रकार त्वरित थांबवून विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान टाळावे असे आवाहन पालक आणि विद्यार्थी वर्गातून होत आहे.
खानापूर तालुक्यातील अनेक महाविद्यालयात असाच प्रकार निदर्शनाला आला. हॉल तिकीट प्रवेश पत्रिका मिळाली नसल्याने ऐनवेळी विद्यार्थ्यांनी शाळेसमोर येऊन बराच गोंधळ घातला. त्यामुळे महाविद्यालयांच्या प्राचार्यसह व्यवस्थापन मंडळालाही वेळी काही करता आले नाही. विद्यापीठाशी संपर्क साधला असता उडवा उडवीची उत्तरे दिली गेली. त्यामुळे याला महाविद्यालयांना जबाबदार ठरवण्यात आले. मात्र हे साप चुकीचे आहे.केवळ ऑनलाइन धोरणामुळे या विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर टांगती तलवार पडली आहे. त्यामुळे महाविद्यालयाचा ही नाईलाज झाला आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया गेले असून पहिल्या सेमिस्टर मधील परीक्षेला त्यांना वंचित राहण्याची वेळ आली आहे. आम्हाला पर्याय द्या अशी मागणी अनेक विद्यार्थ्यांनी राणी चन्नम्मा विद्यापीठांसमोर केली. मात्र या नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या या कार्यप्रणाली बद्दल विद्यार्थी वर्गासह पालक वर्गातून तीव्र आक्षेप व्यक्त केला जात आहे.