स्वर्गीय उदयसिंह सरदेसाई यांची विचारधारा पोचवण्याचे करणार काम: आज जन्मदिनी पुण्यस्मरण सोहळा

खानापूर तालुक्याच्या राजकीय सामाजिक व शैक्षणिक पटलावर नेहमी नाव समोर येते ते आदरणीय दिवंगत उदयसिंग सरदेसाई तसेच खानापूर तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीय निळकंठराव सरदेसाई यांचे होय.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे आंदोलन असो वा सामाजिक कार्य, यामध्ये या घराण्याने अविरतपणे कार्य केले आहे. स्वर्गीय माजी आमदार निळकंठराव सरदेसाई यांनी खानापूर तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेता विधायक कामे आपले आमदारकीच्या काळात राबवली म्हणून आज त्यांचे नाव खानापूरच्या पटलावर आहे.त्यांच्याच धरतीवर काम करणारे त्यांचे बंधू स्वर्गीय उदयसिंग सरदेसाई यांचेही नाव कायम एक थोर साहित्यिक व गाढे अभ्यासक म्हणून परिचित बहुजन समाजाला उत्तेजित करून त्यांना दिशा देण्याचे कार्य त्यांनी आपल्या गाड्या अभ्यासातून नेहमी देण्याचे काम केले. आज त्यांच्याच धरतीवर समाज प्रबोधन व आपल्या उच्च शिक्षिततेचा वसा खांद्यावर घेऊन सदैव कार्यतत्पर राहणारे गुरु होणारी व्यक्तिमत्व म्हणून स्वर्गीय उदयसिंग सरदेसाई यांचे सुपुत्र व माजी आमदार स्वर्गीय नीलकंठराव सरदेसाई यांचे पुतणे श्रीयुत निरंजन उदयसिंग सरदेसाई यांच्याकडे पाहिले जाते. एका बहुराष्ट्रीय कंपनीत उच्चपदावर काम करत गावाकडील सामजिक कार्य, व सीमा लढ्याच्या चळवळीत नेहमी पुढे असतात. शिवाय स्वतः एक प्रगतशील शेतकरी आहेत. शेतीतून स्वावलंबी होता येत असल्याने तरुणांनी शेतीकडे वळावे, असे त्यांचे मत आहे. शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढावा यासाठी ते आग्रही आहेत. नोकरी, जनकल्याण, कौटुंबिक गरजा आणि जबाबदाऱ्या यांचा समतोल ते उत्तमरित्या राखतात. म्हणूनच ते खानापूर तालुक्यातील सामाजिक चळवळीतील महत्वाचा घटत बनले आहेत.
निरंजन यांना कुटुंबाकडूनच जनकल्याणाचा वारसा लाभला आहे. खानापूर म. ए. समितीचे दिवंगत माजी आमदार निळकंठराव सरदेसाई यांचे ते पुतणे आहेत. त्यामुळे सामाजिक कार्य राजकीय जाणिवेचा वारसा त्यांना जन्मताच लाभलेला आहे. तो ते सेवाभावी वृतीतून तत्परतेने पुढे चालवत आहेत.
खानापूरच्या सर्वोदय विद्यालयात शालेय शिक्षण पूर्ण करून गावात बी.कॉम केले आहे. एम.बीए या पदव्या संपादित केल्या. त्यानंतर त्यांनी घट पुण्यातील एका माहिती तंत्रज्ञानक्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी पत्करली. आज या कंपनीत कार्यरत आहेत. आपली नोकरी सांभाळताना त्यांनी तालुक्यातील ३५ ते ४० पदवीधर तरुणांना पुणे, बंगळूर, मुंबई अशा ठिकाणी असलेल्या आपल्या परिचितांच्या माध्यमातून नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या आहेत. आजही ते सुशिक्षित, पदवीधर तरुणांना प्रोत्साहन देत त्यांच्या मदतीला सदैव तत्पर असतात.

शैक्षणिक उपक्रमांत पुढे

खानापूर तालुक्यातील तरुण शिक्षणापासून दूर जात असलेल पाहून त्यांनी अनेकामध्ये जागृती केली आहे. ज्ञानवर्धिनीसारख्या शैक्षणिक उपक्रम राबवणाऱ्या संस्थेच्या कार्यक्रमात भाग घेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व तरुणांना शिक्षणाचे महत्व पटवून देण्याचे काम स्वयंस्फूर्तीने केले आहे. ज्ञानवर्धिनी या पीटर डिसोझा यांनी सुरु केलेल्या उपक्रमाशी कायमस्वरूपी जोडले गेले आहेत. ग्रामीण भागातील होतकरु मुलांना शैक्षणिक मार्गदर्शन करता यावे आणि आपल्या तालुक्यातूनही आयएएस, आयपीएस अधिकारी व्हावेत अशी इच्छा ठेऊन ते कार्यरत आहेत. त्यांनी अनेकदा अशा उपक्रमांना आर्थिक साहाय्य केले असून तालुपातील अनेक शाळामध्ये शैक्षणिक साहित्याचे वाट

कोविड काळातील सेवा

कोविडच्या काळात त्यांनी अनेकांना मदत केली आहे. कोविड रुग्णाना रुग्णालयात दाखल करण्यापासून ते मृताच्या नातेवाईकाच्या मदतीला ते घडून गेले. अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढे आलेल्या राणांना कोविडचा संसर्ग होऊ नये म्हणून त्यांनी पीपी किट करून दिले. खानापुरातील लोकांची रुग्णवाहिके अभावी गैरसोय होत होती. ती दूर व्हावी यासाठी भगवा रक्षक संघटनेने अनेकांच्या मदतीने रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. या कामातही निरंजन यांनी हातभार लावला. सदर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आपली नोकरी सांभाळुन जनजागृती करताना कधी स्वयंसेवी संघटना, शालेय विद्यार्थी, शेतकरी व ग्रामीण भागातील जनतेच्या न्याय देण्यासाठी ते धाऊन जातात. तहसीलदार, जिल्हाधिकारी आदींना भेटून त्यांनी जनतेचे प्रस्न मांडले आहेत. बेळगाव-गोवा महामार्गावरील संपादित जमिनीचा मोबदला गरीब शेतकन्यांना मिळावा यासाठी त्यानी जिल्हाधिकायाकडे पाठपुरावा केला.

दुर्गसंवर्धनाचे कार्य

ते एक पर्यावरणप्रेमी दुप्रिमीती आहेत. साप्ताहिक या दिवशी निसर्गरम्य ठिकाणांसह महाराष्ट्रातील अनेक गड-किल्ल्यांना भेट देण्याची छंद त्यांना आहे. दुर्गभ्रमंती करताना त्यांनी दुर्गसंवर्धनाचे कामही केले आहे त्यांनी शिवाजी ट्रेल या दुर्गा संवर्धन करणाऱ्या संस्थेशी संलग्न राहून सिमेंटची पोती स्वतःखांद्यावर घेऊन किल्ल्यावरील डागडुजीसाठी श्रमदान केले आहे. इतिहासाचा अभ्यास करत ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. त्यांना वाचन आणि छंद आहे. निरंजन सरदेसाई सध्या खानापूर म ए. समितीच्या कार्यात सक्रिय आहेत. समितीच्या कोणत्याही आंदोलनात यांचा सक्रिय सहभाग असतो. मराठी भाषा व संस्कृती जतन करण्यासाठी सीमाभागात जागृती करून सीमाला आपल्यापरीने खारीचा वाटा उचलावा आणि सीमाप्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहा, असे त्यांचे मत आहे.
सीमालढ्यातील तिसरी पिढी
खानापूरकर सरदेसाई यांचे घर १९५६ पासून संयुक्त महाराष्ट्र चळवळीशी जोडले गेले आहे. सीमा सुटावा यासाठी पुकारलेल्या साराबंदी लढयात निरंजन यांचे आजोबा दत्ताजीराव बळवंतराव सरदेसाई यांचा सक्रिय सहभाग होता.खानापूर तालुक्यातून त्यांच्याच नेतृत्वाखाली पहिली तुकडी निघाली. त्यांना विसापूरमध्ये एक शिक्षा झाली होती. त्यानंतर दिवंगत वडील उदयसिंहराव सरदेसाई यांनी आपले संपूर्ण आयुष्य सीमाचळवळीसाठी खर्ची घातले, बंधू दिवंगत माजी आमदार निळकंठराव सरदेसाई यांच्यानंतर म. ए. समितीच्या प्रत्येक उमेदवाराला निवडून आणण्यात त्यांनी खूप महत्त्वाची भूमिका निभावली होती. तेही निरपेक्ष व त्यागाच्या भूमिकेत राहून सीमाही त्यागावर आणि मराठी अस्मितेवर आधारलेली आहे. हे त्यांनी वेळोवेळी आपल्या तालुक्यातील नेतेमंडळींना दिले.

खानापुरात आज पुण्यस्मरण सोहळा Lस्वर्गीय उदयसिंह सरदेसाई यांचा आज जन्मदिनाचे अवचित साधून अमृत महोत्सवी पुणे सोहळा येथील शुभम गार्डनमध्ये सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आला आहे या निमित्ताने मी मराठी आम्ही मराठी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून व्याख्याते व माता जिजाऊ यांचे वंशज श्री नामदेवराव जाधव यांचे व्याख्यान व प्रबोधन यावेळी होणार आहे तरी समस्त मराठी भाषिकांनी या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवावी असे आवाहन गौरव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us