रामनगर : अलीकडच्या काळात गांजा विक्रीत अल्पवयीन मुलांना व्यसनाधीन करण्यासाठी अनेक टोळ्या सरसावल्या आहेत. खानापूर लोंढा भागात अनेक ठिकाणी गांजा विक्रीची प्रकरणे दिवसेंदिवस उघडगीत येत आहेत. दोनच दिवसापूर्वी खानापूर येथे एकाला गांजा विक्री प्रकरणी अटक करण्यात आले होते. अशाच प्रकारे रामनगर पोलिसांनीही लोंढा नजीक बेळगाव ,पणजी राष्ट्रीय महामार्गावर गांजा विक्री करणाऱ्या एकाला ताब्यात घेऊन त्याला न्यायालयीन कोठडी दिली आहे.
याबाबत रामनगर पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती की, बेळगाव पणजी राष्ट्रीय महामार्गावर लोंढा नजीक पंकज मोहिते रा. लोंढानामक व्यक्तीकडून गांजा विक्री होत असल्याचे कळतात सापळा रचून त्याला अटक करण्यात आले. त्याच्याकडून जवळपास 12000 किमतीचा 604 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बसवराज मगदूम यांनी केलेल्या कारवाईबद्दल या भागातून समाधान व्यक्त होत आहे
वास्तविक गांजा विक्री प्रकरणामुळे अनेक अल्पवयीन शालेय विद्यार्थी व्यसनाच्या आहारी गेले आहेत. खानापूर तालुक्यात गांजा प्रकरणात अनेक शालेय विद्यार्थी अडकल्याने पालकांच्या मध्ये मोठी धास्ती निर्माण झाली आहे. दोनच दिवसापूर्वी खानापूर तालुक्यात झालेले एक आत्महत्या प्रकरण देखील या गांजा प्रकरणाशी संबंधित असल्याचे चौकशी आणते दिसून आले आहे. असाच प्रकारे खानापूर तालुक्यातील अनेक युवक अशा व्यसनाच्या आहारी गेलेले दिसून येत आहेत. त्यामुळे या गांजा विक्री प्रकरणावर पोलिसांनी योग्य कारवाई करून त्यांना जेरबंद करावे अशी मागणी पालक वर्गातून केली जात आहे. खानापूर येथे एकाला अटक केल्यानंतर रामनगर पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे पालक वर्ग व सर्वसामान्य नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. अशीच कारवाई आणखीन गांजा विक्री टोळीना ताब्यात घेऊन करावी अशी मागणी केली जात आहे.