जांबोटी (प्रतिनिधी) खानापूर तालुक्यात स्वातंत्र्य काळानंतर समितीच्या शाळांनी शाळा जगवण्याचे काम केले पण तदनंतरच्या काळात शाळांचा विकास होत गेला माध्यमिक शाळांची निर्मिती झाली जांबोटी सारख्या दुर्गम भागात शिक्षणापासून वंचित असणाऱ्या गरीब व जंगलातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय व्हावी म्हणून विश्वभारत सेवा समितीने 1984 स*** कणकुंबी येथे पहिले माऊली विद्यालय सुरू केले आज या विद्यालयात अनेक विद्यार्थी घडवून गेले सुरुवातीच्या काळात जुन्या इमारतीत कार्यरत असलेल्या शाळेत शिक्षणाची ज्ञानगंगा विखुरली पण गेल्या चार वर्षांपूर्वी या ठिकाणी शाळेची नवीन इमारत उभी करून एक आधुनिक शिक्षण पद्धतीचा गाडा विश्वभारत सेवा समितीने या ठिकाणी अविरत सुरू ठेवला आहे याचा आज चौथा वर्धापन दिन साजरा करताना अत्यानंद होत असून यासाठी झटलेल्या सर्व विश्वस्त मंडळी तसेच आजी-माजी विद्यार्थी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वर्गांचे कौतुक करावे तितके कमीच असल्याचे विचार महालक्ष्मी तोपिन कट्टी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल हलगेकर यांनी व्यक्त केले सोमवारी या शाळेचा चौथा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी ते प्रमुख अतिथी या नात्याने बोलत होते
यावेळी झालेल्या कार्यक्रमात दीप प्रज्वलन महालक्ष्मी ग्रुपचे
संस्थापक अध्यक्ष विठ्ठल हलगेकर, विश्वभारत सेवा समिती अध्यक्ष विजयराव नंदीहळी, उद्यमबाग येथील पावनाई इंडस्ट्रीजचे मालक साईप्रसाद सडेकर, कंत्राटदार निंगापा पाटील आदींच्या हस्ते करण्यात आले प्रारंभी उपस्थित यांचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक सुनील चिगुळकर यांनी करून. या शाळेची स्वतःची इमारत होती, पण जुनाट होती.चार वर्षांपूर्वी या शाळेची नूतन इमारत बांधण्यात आली. जांबोटी भागाच्या शैक्षणिक विकासासाठी माजी आमदार परशुरामभाऊ नंदीहाळी यांनी या भागात शिक्षणाची खऱ्या अर्थाने मुहूर्तमेढ रोवली. त्यामुळे तळागाळातील गोरगरीब दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना या शिक्षणाचा लाभ मिळाला. 1984 मध्ये या शाळेची उभारणी केल्यानंतर या शाळेमधून आतापर्यंत हजारो विद्यार्थी शिकवून विविध उच्चस्त पदावर विराजमान झाले आहेत हा स्वाभिमान आहे. या भागात निर्माण झालेली ही शाळा या भागाचा गौरव असून या शाळेच्या प्रगतीसाठी अथक परिश्रम घेऊन अनेकांनी झटले आहे. असल्याचे त्यांनी सांगितले
यावेळी बोलताना विजयराव नंदिहळी म्हणाले, या भागातील ही एकमेव शिक्षण संस्था या भागात एक ज्ञानगंगा म्हणून परिचित झाली आहे. या गुरुवर्यांच्या योगदानांचे हे कार्य असत तेव्हा ठेवण्या साठी असेच सहकार्य या भागातील विद्यार्थी पालक व शिक्षक वर्गणी द्यावे या शाळेचे विद्यमान मुख्याध्यापक यापूर्वीचे शिक्षक वर्ग विद्यमान शिक्षक, तसेच या शाळेत सेवा बजावून गेलेले शिक्षक यांनी शाळेच्या प्रगतीसाठी केलेली ही तळमळ खरोखर उल्लेखनीय असल्याचे विचार त्यांनी मांडले कार्यक्रमाला कार्यक्रमाला अधिवक्ते केशव कळेकर, गोविंद काळसेकर, निंगाप्पा पाटील, नारायण कालमणकर, सुभाष गावडे, बी डी पाटील, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष महेश नाईक व इतर मान्यवर उपस्थित होते. शेवटी आभार सहशिक्षक करंबळकर यांनी मांडले.