Home » येळ्ळूरच्या सदन हावळ याचे राज्यस्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णयश!

येळ्ळूरच्या सदन हावळ याचे राज्यस्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णयश!

file_00000000a4ac82119dc3e62995671ae0

येळ्ळूरच्या सदन हावळ याचे राज्यस्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णयश!

८० मीटर (Hurdles)अडथळा शर्यतीत प्रथम क्रमांक; येळ्ळूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

खानापूर / प्रतिनिधी : कर्नाटक राज्य ज्युनियर अॅथलेटिक्स स्पर्धा २०२६ मध्ये येळ्ळूर येथील सदन हावळ याने उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे. तुमकूर येथील महात्मा गांधी स्टेडियमवर ५ ते ७ ऑक्टोबरदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेत १६ वर्षांखालील वयोगटातील ८० मीटर अडथळा शर्यतीत त्याने प्रथम क्रमांक मिळवून यश संपादन केले.

सदन हावळ हा येळ्ळूर येथील ज्येष्ठ नागरिक जयपाल हावळ यांचा नातू, तर सामाजिक कार्यकर्ते युवराज जयपाल हावळ यांचा सुपुत्र आहे. त्याच्या या यशामुळे येळ्ळूर गावासह परिसरातून त्याचे अभिनंदन होत आहे.

सदन हा सध्या बेळगाव येथील जीएसएस महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही त्याने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.

या यशासाठी त्याला प्रशिक्षक वैभव गाडेकर आणि सुमित यांचे मार्गदर्शन लाभले. योग्य मार्गदर्शन, नियमित सराव आणि मेहनतीच्या जोरावर सदनने राज्यस्तरावर सुवर्णपदक मिळवून गावाचा नावलौकिक वाढवला आहे.

त्याच्या या यशाबद्दल कुटुंबीय, मित्रपरिवार, ग्रामस्थ आणि क्रीडाप्रेमींकडून अभिनंदन करण्यात येत असून, पुढील क्रीडा वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Do Share

You may have missed

error: Content is protected !!
Call Us