Oplus_16909312
खानापूर/प्रतिनिधी:
खानापूर ते चापगाव या ग्रामीण मार्गावर सध्या बस सेवेचा मोठा अभाव जाणवत असून, प्रवाशांना दररोज प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि ग्रामीण भागातील नागरिकांची अडचण दूर करण्यासाठी खानापूर आगारातून अतिरिक्त बस फेऱ्या सुरू कराव्यात, अशी आग्रही मागणी आता जोर धरू लागली आहे.
विद्यार्थी, नोकरदार आणि व्यावसायिकांचे हाल:
मिळालेल्या माहितीनुसार, विशेषतः सकाळी साडेनऊ वाजल्यानंतर या मार्गावर नियमित बस सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे शाळा-कॉलेजचे विद्यार्थी, शासकीय व खासगी क्षेत्रातील नोकरदार, व्यापारी तसेच कामानिमित्त तालुक्याच्या ठिकाणी येणाऱ्या ग्रामीण नागरिकांना वेळेत पोहोचणे कठीण झाले आहे.
सायंकाळी ५ नंतर प्रवाशांना ‘खासगी’ वाहनांचाच आसरा:
सकाळच्या सत्राप्रमाणेच सायंकाळी पाच वाजल्यानंतर खानापूरहून चापगाव परिसराकडे जाण्यासाठी कोणतीही शासकीय बस उपलब्ध नसते. यामुळे रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. नाईलाजास्तव नागरिकांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत असून, यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तसेच महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण होत आहे.
दुपारी १२ आणि सायंकाळी ७ च्या बसची मागणी:
ग्रामीण जनतेची ही वाढती गरज आणि प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन खानापूर आगारातून दुपारी १२ वाजता आणि सायंकाळी ७ वाजता या दोन अतिरिक्त बस फेऱ्या तातडीने सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी ‘खानापूर लाईव्ह’च्या वतीने खानापूर मतदारसंघाचे आमदार श्री. विठ्ठल हलगेकर यांच्याकडे करण्यात आली आहे.
या मार्गावर तात्काळ अतिरिक्त बस सेवा सुरू झाल्यास विद्यार्थी, महिला, शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता आमदार हलगेकर आणि परिवहन महामंडळ यावर काय निर्णय घेते, याकडे चापगाव परिसरातील जनतेचे लक्ष लागले आहे.
ಖಾನಾಪುರ-ಚಾಪಗಾಂವ್ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ಬಸ್ ಸೇವೆಗಳ ತೀವ್ರ ಕೊರತೆಯಿದ್ದು, ಪ್ರಯಾಣಿಕರಿಗೆ ದಿನನಿತ್ಯದ ತೊಂದರೆಯಾಗುತ್ತಿದೆ. ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು, ಕಚೇರಿಗೆ ಹೋಗುವವರು, ವ್ಯಾಪಾರಿಗಳು ಮತ್ತು ಗ್ರಾಮೀಣ ನಿವಾಸಿಗಳು ಗಮನಾರ್ಹ ತೊಂದರೆಗಳನ್ನು ಎದುರಿಸುತ್ತಾರೆ, ವಿಶೇಷವಾಗಿ ಬೆಳಿಗ್ಗೆ 9:30 ರ ನಂತರ ಈ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ನಿಯಮಿತ ಬಸ್ ಸೇವೆಗಳು ಲಭ್ಯವಿಲ್ಲದ ಕಾರಣ.
ಖಾನಾಪುರದಿಂದ ಚಾಪಗಾಂವ್ ಪ್ರದೇಶಕ್ಕೆ ಸಂಜೆ 5:00 ಗಂಟೆಯ ನಂತರ ಪ್ರಯಾಣಿಸಲು ಯಾವುದೇ ಬಸ್ಗಳು ಲಭ್ಯವಿಲ್ಲದ ಕಾರಣ ಪ್ರಯಾಣಿಕರು ಸಹ ಬಳಲುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಪರಿಣಾಮವಾಗಿ, ಅನೇಕರು ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳನ್ನು ಅವಲಂಬಿಸಬೇಕಾಯಿತು, ಇದು ಹೆಚ್ಚುವರಿ ಆರ್ಥಿಕ ಹೊರೆಯನ್ನುಂಟುಮಾಡುತ್ತದೆ.
ಈ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ, ‘ಖಾನಾಪುರ ಲೈವ್’ ಖಾನಾಪುರ ಡಿಪೋದಿಂದ ಮಧ್ಯಾಹ್ನ 12:00 ಮತ್ತು ಸಂಜೆ 7:00 ಗಂಟೆಗೆ ಹೆಚ್ಚುವರಿ ಬಸ್ ಸೇವೆಗಳನ್ನು ಪರಿಚಯಿಸಲು ಒತ್ತಾಯಿಸಿದೆ.
ಗ್ರಾಮೀಣ ನಿವಾಸಿಗಳ ಹೆಚ್ಚುತ್ತಿರುವ ಅಗತ್ಯಗಳನ್ನು ಪರಿಗಣಿಸಿ ಈ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚುವರಿ ಬಸ್ ಪ್ರಯಾಣವನ್ನು ತಕ್ಷಣವೇ ಪರಿಚಯಿಸುವಂತೆ ಶಾಸಕ ವಿಠ್ಠಲ್ ಹಲ್ಗೇಕರ್ ಅವರಿಗೆ ವಿನಂತಿಸಲಾಗಿದೆ. ಈ ಕ್ರಮವು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು, ಮಹಿಳೆಯರು, ಹಿರಿಯ ನಾಗರಿಕರು ಮತ್ತು ಕೆಲಸಕ್ಕೆ ಪ್ರಯಾಣಿಸುವವರಿಗೆ ಅಗತ್ಯವಾದ ಪರಿಹಾರವನ್ನು ನೀಡುತ್ತದೆ.