IMG-20260313-WA0019

खानापूर न्यूज :
सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा, तोपिनकट्टी येथील इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा कार्यक्रम आज दिनांक 12 मार्च 2026 रोजी शाळेच्या सभागृहात उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा सुधारणा व व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. हुवापा गावडू गुरव हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींच्या ईशस्तवन व स्वागत गीताने झाली. त्यानंतर सातवीच्या विद्यार्थ्यांनी दीपोत्सव करून कार्यक्रमाला चालना दिली.
आयुष्यात पुढे जाण्यासाठी शिक्षण फार महत्त्वाचे आहे. नेहमी अभ्यास करा, ज्ञान वाढवत रहा आणि शिस्तीचे महत्त्व जाणून घ्या. जीवनात कठीण असे काहीच नसते; योग्य प्रयत्नातून कोणतेही ध्येय गाठता येते. जीवनात फुकट काहीच मिळत नाही आणि प्रामाणिक प्रयत्न केले तर मिळवायचे काहीच अशक्य राहत नाही. सध्या मुली प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत. त्यामुळे मुलांनीही प्रामाणिकपणे अभ्यास करून आपले स्थान अबाधित ठेवले पाहिजे. स्वप्ने मोठी ठेवा आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा, असे प्रेरणादायी विचार वर्गशिक्षक श्री. पी. जी. पाखरे सर यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती एच. ए. परेरा मॅडम यांनी केले. अध्यक्षस्थानावरून बोलताना श्री. हुवाप्पा गावडू गुरव म्हणाले की, चांगला अभ्यास करा, चांगले नागरिक बना आणि आपल्या शाळेचे नाव उज्ज्वल करा. अपयशाने खचून जाऊ नका आणि यशाने भांबावून जाऊ नका, असा मोलाचा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
कुमार श्रीनाथ विवेकानंद पाटील याला आदर्श विद्यार्थी, कुमारी प्रगती प्रफुल मास्तमर्डी हिला आदर्श विद्यार्थिनी तर कुमारी पुष्पा महादेव हुंदरे हिला अष्टपैलू विद्यार्थिनी म्हणून स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले. वर्षभरामध्ये विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात गौरवण्यात आले. इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेविषयीच्या आठवणी व शाळेविषयी, शिक्षकांविषयी आपले आदर युक्त विचार व्यक्त केले. इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांकडूनही सातवीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमाला शाळा सुधारणा व व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष सौ. सरस्वती चांगदेव गुरव, तसेच श्री. पी. एन. गुरव, श्री. मल्लेशी तिरवीर, श्री. संजय मादार, श्री. जोतिबा होसुरकर, श्री. जोतिबा बेकवाडकर, सौ. गीता गंगाराम हलगेकर, सौ. मलप्रभा सुतार, सौ. गंगा जोतिबा तिरवीर, सौ. पूजा ज्योतिबा गुरव, सौ. सोनाली सुनील पाटील, सौ. सुनिता संतोष करंबळकर, श्रीमती घाडगे मॅडम, श्री एल डी पाटील सर,श्री. ईश्वर हलगेकर, शाळेच्या शिक्षिका श्रीमती एस आर पाटील, श्रीमती टी के कुंभार, श्रीमती प्रिया खांबले, कन्नड शिक्षक श्री विठ्ठल हंचीनमणी उपस्थित होते.
यावेळी निवृत्त सैनिक श्री. जोतिबा अशोक करंबाळकर यांचा सेवानिवृत्ती निमित्त शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती वैशाली काशीद मॅडम यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. एम. एल. कुंभार शिक्षक यांनी केले.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us