खानापूर : तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री विठ्ठलराव सोमना हलगेकर यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा, तोपिनकट्टी येथील शाळा सुधारणा व व्यवस्थापन समिती (SDMC) तर्फे हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
या प्रसंगी आमदार हलगेकर यांच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य व यशस्वी कार्यप्रवासासाठी अभिष्टचिंतन करण्यात आले. त्यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात होणाऱ्या शैक्षणिक, सामाजिक व विकासकामांची प्रशंसा यावेळी करण्यात आली.
या कार्यक्रमास SDMC समितीचे अध्यक्ष श्री हुवाप्पा गावडू गुरव, श्री परशराम गुरव (सदस्य), श्री बाळकृष्ण कुंभार (सदस्य), श्री मल्लेशी तिरवीर (सदस्य),श्री जोतिबा बेकवाडकर (सदस्य), श्री राजू करंबळकर आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी आमदारांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देत भावी कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.