Screenshot_2025-12-29-23-34-53-66_680d03679600f7af0b4c700c6b270fe7

चापगाव /प्रतिनिधी : चापगाव जळगा मार्गावरील डोंगरी माळ परिसरात भर दिवसा रस्त्यावर दोन बिबट्यांचे दर्शन झाल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर डोंगरी माळ परिसरातील कोंबडी फार्म जवळ सदर दोन व्यक्ती रस्ता पार करत असताना ग्रामपंचायत सदस्य सूर्याजी पाटील वड्डेबैल यांच्या वाहनासमोर आले चारचाकी वाहन असल्याने त्यांनी आपले वाहन थांबून त्यांचा फोटो टिपण्याचा प्रयत्न केला तेवढ्यात त्या दोन्ही बिबट्याने रस्ता ओलांडून जंगलात गेल्याचे त्यांनी खानापूर लाईव्ह शी बोलताना सांगितले.

याबाबत त्यांनी दिलेली माहिती की, सोमवारी सकाळी 9च्या सुमारास नेहमी आपला छोटा हत्ती वाहनातून ते खानापूरच्या दिशेने जात असताना डोंगरी माळ जवळील जंगलातून दोन जंगली बिबटे रस्त्यावर आले.त्यामुळे त्यांची घाबरगुंडी निघाली. मात्र त्यांनी चार चक्की वाहनात असल्याने स्वतःला धीर देत फोटो काढण्याचा प्रयत्न केला. तेवढा ते दोन्ही बिबटे रस्ता ओलांडून दुसरीकडे गेले. एकूणच या परिसरात गर्द झाडी आहे. चापगाव जळगाव हा अलीकडे नेहमीचा वरदळीचा रस्ता बनला आहे.दुचाकी चारचौकी वाहनांची दिवसेंदिवस गर्दी असल्याने प्रवासी वर्गांना भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागात नेहमी जंगली प्राण्यांचा वावर असतो. मागील वर्षी या ठिकाणी आठ दिवस हातीने देखील ठाण मांडले होते. आता या परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने शेतकऱ्यात मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर दोन बिबटे प्रत्यक्ष दर्शनी दिसल्याने शेतकऱ्यांनी या भागात सतर्कता राखावी असे आवाहनही ग्रामपंचायत सदस्य सूर्याजी पाटील यांनी केले आहे. याबाबत वन खात्याने तातडीने डोंगरी माळ परिसरात मोहीम राबवून त्या बिबट्यांना या परिसरातून हद्दपार करण्यात यावे अशी मागणी केली जात आहे.

Do Share
error: Content is protected !!
Call Us