खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी: जीवनात कोण कशाप्रकारे देवदूत म्हणून कोणाच्या पाठीशी उभे राहील हे सांगता येत नाही. अनेक वेळा अनोळखी माणसाच्या प्रसंगात दुसराच अनोळखी माणूस उपयोगी पडतोय त्यामुळे माणूस हा कधी कोणाला उपयुक्त पडेल हे सांगता येत नाही अशाच पद्धतीने खानापूरच्या माजी आमदार तथा एआयसीसी सचिव डॉ अंजलीताई हेमंत निंबाळकर यांनी आज गोवा – दिल्ली विमान प्रवासात वाचविला परदेशी तरूणीचा जीव.
डॉक्टर अंजली निंबाळकर या काल इंडिगो विमानाने गोव्यावरून दिल्ली प्रवास करत असताना अचानक एका परदेशी तरुणीस हृदय आघाताचा त्रास जाणवू लागला व तरुणी बेशुद्ध पडली आणि विमानात एकच धावप़ळ उडाली. परंतु विमानात डॉ. अंजली ताई निंबाळकर प्रवास करत असताना त्यांच्या निदर्शनाला ही बाब आली त्यांनी लगेच परदेशी मुलीचे चेकअप करून नाडी चेक केली तसेच cardio pulmonary resuscitation उपचार करून परदेशी मुलींस शुद्धीवर आणले.
अर्धा तासाने पुन्हा त्या परदेशी मुलीस झटके येऊन ती पुन्हा बेशुद्ध पडली, डॉ अंजलीताईंनी आपला वैद्यकीय अनुभव कसास लावून पुन्हा त्या परदेशी मुलीस शुद्धीवर आणले आणि गोवा – दिल्ली असा दोन अडीच तासाचा पूर्ण विमान प्रवास त्या मुलीच्या शेजारी उभे राहून तिची देखरेख व सेवा करीत केला.
दिल्ली विमानतळावर विमानाचा भूस्पर्श झाल्यानंतर प्रवासात असतानांच वैमानिका मार्फत धावपट्टीवर बोलवून घेतलेल्या रूग्नवाहिकेतून रूग्नाची दवाखान्यात तातडीने रवानगी केली.
अंजलीताईंच्या या रूग्न सेवेबद्द्ल वैमानिक तसेच सहप्रवाशांनी टाळ्यांच्या कडकडात विषेश आभार मानले.