2025_12_05_22_06_23_237

खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी:

ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठान खानापूर आयोजित सन २०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमालांची सुरवात रविवार दि. ७ डिसेंबर २०२५ रोजी होत असून १४ डिसेंबर व २१ डिसेंबरलाही व्याख्यानमालांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

नंदगड, हलशी, चापगाव, इदलहोंड व जांबोटी या ५ मराठी केंद्रांवर तर नंदगड, देवलत्ती व गंदीगवाड या ३ कन्नड केंद्रांवर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आलेल्या आहेत. तरी सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व शिक्षणप्रेमीनी यामध्ये उस्फुर्तपणे सहभागी होऊन आपल्या विद्यार्थ्यांच्या गुणात्मक विकासाबरोबरच सर्वांगीण विकास साधण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.

ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठान खानापूर (बेळगाव)

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us