खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी :
तालुक्यातील चापगाव येथील सरकारी हायर मराठी प्राथमिक शाळेला येत्या फेब्रुवारी 2026 मध्ये 100 वर्षे होत आहेत. या शतक पूर्तते निमित्त येत्या फेब्रुवारी 2026 मध्ये शताब्दी महोत्सव सोहळा साजरा करण्याचा निर्णय आज शुक्रवारी शाळेच्या माजी विद्यार्थी तथा शाळा व्यवस्थापन कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष मशनू चोपडे होते प्रारंभी उपस्थित यांचे स्वागत शाळेचे माजी विद्यार्थी पत्रकार पिराजी कुऱ्हाडे यांनी केले. व शाळेच्या 100 वर्षाच्या स्थापनेपासूनचा लेखाजोगा आराखडा मांडला. व येत्या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात एक दिवसीय शताब्दी महोत्सव साजरा करण्यासंदर्भात लवकरच रूपरेषा आपण शताब्दी महोत्सव समितीची स्थापना करण्यात यावी अशी सूचित केले. यावेळी माजी विद्यार्थी ग्रामपंचायत माजी अध्यक्ष रमेश धबाले यांनीही मराठी मातृभाषा टिकवण्याबरोबर शाळेच्या प्रगतीसाठी हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा असा असून शाळेच्या आतापर्यंतच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येणे अत्यंत गरजेचे असल्याचे विचार मांडले. ग्रामपंचायत सदस्य व माजी विद्यार्थी मारुती चोपडे यांनीही शाळेच्या विकासासाठी ग्रामपंचायत मार्फत राबविण्यात येत असलेल्या योजना बरोबर सध्या मंजूर झालेल्या अनुदानातून शाळेच्या विकासाची कामे लवकर पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करण्यात यावा व लवकरच शताब्दी महोत्सव समितीची स्थापना करून जबाबदाऱ्या विभागून द्याव्यात असे सुचित केले. शिक्षक तथा माजी विद्यार्थी यल्लाप्पा को कडोळकर यांनीही शाळेच्या विकासासंदर्भात असलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न करणे. शालेय विद्यार्थ्यांना सुविधा कशा देता येतील या संदर्भात विचार मंथन करून पुढील क्रम घेण्यासंदर्भात सूचना मांडल्या. यावेळी शाळेचे माजी निवृत्ती शिक्षक व माजी विद्यार्थी विलास दबाले, माजी विद्यार्थी माजी ग्रामपंचायत सदस्य संजय पाटील, आल्लेहोळ माजी विद्यार्थी आप्पाजी पाटील,आदींनी विचार मांडले एसीडीएमसी अध्यक्ष मष्णू चोपडे यांनी शाळेचा शताब्दी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी शाळेच्या प्रत्येक माजी विद्यार्थ्यांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. शाळा व्यवस्थापन कमिटी शताब्दी महोत्सव कमिटीच्या बरोबर काम करत शाळेच्या विकासासाठी नेहमी सहकार्याची भूमिका घेईल गावातील सर्व माझी विद्यार्थी व जेष्ठ व्यक्तींनी या कार्यात सहभागी होऊन एक आनंद सोहळा साजरा करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले. पुढील बैठकीत शताब्दी महोत्सव समितीची स्थापना. मराठी प्राथमिक शाळेत आज शताब्दी महोत्सव पूर्वनियोजित बैठक पार पडली. अनेक माजी विद्यार्थी उपस्थित होते पुढील बैठकीत पुन्हा यासंदर्भात नियोजना संदर्भात चर्चा करून शताब्दी महोत्सव समितीची रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला. याकरिता येत्या सोमवार दि. 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता पुन्हा बैठक बोलावण्यात आली आहे. यासाठी या मराठी प्राथमिक शाळेत सातवीपर्यंत शिकलेल्या चापगाव गावासह अल्लेहोळ, शिवोली, वड्डेबैल, हडलगा, तसेच यडोगा येथील माजी विद्यार्थ्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहून आपल्या सूचना मांडाव्यात. तसेच शताब्दी महोत्सव कमिटीमध्ये सहभाग दर्शवावा असे आवाहन या बैठकीद्वारे करण्यात आले आहे. या बैठकीला अभिजीत पाटील, महादेव दळवी, फोन्डू कुराडे,नागराज धबाले, अरुण धबाले, मष्णू सुतार, रफिक सनदी, बशीर सनदी, प्रभू कदम यल्लाप्पा पाटील, रुखमांना धबाले, बळवंत पाटील, सुभाष बिरजे, महादेव पाटील, महिला सदस्या नम्रता पाटील, आरती पाटील, लक्ष्मी जिवाई आदी उपस्थित होत्या. प्रारंभी उपस्थित यांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक महेश कवळेकर यांनी केले. तर आभार शिक्षक आरेर यांनी मांडले.