खानापूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, खानापूर शाखेतर्फे संघाच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त रविवारी (ता. २६) दुपारी ३ वा. पथसंचलन आयोजित केले आहे. याचा प्रारंभश्री स्वामी विवेकानंद इंग्रजी शाळा मैदान, खानापूर येथून होणार आहे. याबाबत तालुका कार्यवाह जोतिबा कुपटगिरीकर म्हणाले, ‘पथसंचलनाचा मार्ग विवेकानंद शाळा मैदानापासून सुरू होऊन दामले गल्ली, अर्बन बँक चौक, विठोबादेव गल्ली, बेंद्रे खुट, जुना बसस्टँड रोड, गुरव गल्ली, धर्मवीर संभाजी चौक, रविवार पेठ, पारिश्वाड चौक, चौराशीदेवी मंदिर, वाल्मीकी चौक, केंचापूर गल्ली, कडोलकर गल्ली, बुरुड गल्ली चौक, नाईक गल्ली कॉर्नर, लक्ष्मीनगर, हरी मंदिर, आश्रय कॉलनी, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, वर्दे पेट्रोल पंप, राष्ट्रीय महामार्ग, शिवस्मारक, लक्ष्मी मंदिर, महाजन खुट, घोडे गल्ली, निंगापूर गल्ली, चव्हाटा देवस्थान, मठ गल्लीमार्गे पुन्हा विवेकानंद शाळा येथे समारोप होईल. वाहने जुने तहसीलदार कार्यालय परिसरात थांबवावीत. दुपारी २.५० पर्यंत कार्यक्रमस्थळी उपस्थित राहावे.’

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us