Oplus_16777216

Oplus_16777216

खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी:

श्री महालक्ष्मी मंदिर कमिटी व ग्रामस्थ, वडेबैल यांच्या वतीने आज आमदार श्री विठ्ठलराव सो. हलगेकर (खानापूर) यांना श्री महालक्ष्मी मंदिराच्या बांधकामासाठी भरीव निधी देण्याबाबत निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाचे सादरीकरण कमिटीचे अध्यक्ष श्री के. पी. पाटील, उपाध्यक्ष श्री के. एम. पाटील, सेक्रेटरी श्री पी. आर. पाटील, मीडिया प्रमुख श्री भगवंत बी. पाटील तसेच इतर सदस्यांच्या उपस्थितीत झाले. निवेदन देताना श्री व्ही. बी. पाटील सर, श्री प्रमोद पाटील, श्री प्रशांत पाटील, श्री व्यंकट पाटील, श्री बाबाजी पाटील आणि श्री मारुती पाटील पैलवान हे सदस्यही उपस्थित होते.

आमदार हलगेकर यांना मंदिर बांधकामाची सविस्तर माहिती, इस्टिमेशन तपशील व पुढील रूपरेषा सादर करण्यात आली. आमदारांनी ती भक्तीभावाने ऐकून घेत आदरपूर्वक निवेदन स्वीकारले व कमिटी व ग्रामस्थांना पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले. त्यांनी सांगितले की “श्री महालक्ष्मी मंदिर वडेबैल हे श्रद्धेचे केंद्र असून बांधकामासाठी कोणत्याही परिस्थितीत आवश्यक निधी मंजूर करण्यात येईल.” कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने आमदारांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले व सर्व भक्तगणांना सहकार्याचे आवाहन करण्यात आले.

वडेबैल या ठिकाणी पुरातन श्री महालक्ष्मी मंदिर आहे. मंदिरात फक्त पाषाणाची मूर्ती होती. पण ग्रामस्थ, पंच कमिटीने या ठिकाणी श्री महालक्ष्मीचे मंदिर उभारून या ठिकाणी महालक्ष्मी देवीची लाकडी मूर्ती उभारून यात्रा बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार जवळपास 50 लाखाचा आराखडा मंदिराच्या उभारणीसाठी तयार करण्यात आला आहे. देणगीदारांच्या, गावकऱ्यांच्या सहकार्यातून मंदिर उभारण्यासाठी क्रम हाती घेण्यात आला असून काम प्रगतीपथावर आहे.

Do Share
error: Content is protected !!
Call Us